स्थानिक बातम्या

बर्‍हाणपूर येथे दहशतवाद्याला अटक

Balvant Gaikwad

Balvant Gaikwad

बर्‍हाणपूर  – 

गेल्या 13 वर्षापासून फरार असलेल्या इंडियन मुजाहिद्दीन (आई.एम.)च्या अतिरेक्याला एटीएसच्या पथकांनी बर्‍हाणपूर येथे अटक केल्याने स्थानिक पोलिसांची तारांबळ उडाली.

बर्‍हाणपूर येथे गेल्या कित्येक वर्षापासून वास्तव्यास असलेला इंडियन मुजाहिद्दीनचा दहशतवादी अजीज मोहम्मद (वय 40) याला एटीएसच्या पथकाने अटक करून त्याला दि.13 रोजी जिल्हा न्यायालयात उभे केले असता न्या.धीरेंद्रसिंह मंडलोई यांनी दि.16 डिसेंबरपर्यंत मुंबई एटीएसच्या ताब्यात सोपविण्यात आले आहे.पुढची सुनावणी मुंबई येथे होणार आहे.

एटीएसचे पोलीस अधीक्षक रामजी श्रीवास्तव यांनी सांगितले की, बर्‍हाणपूर येथील डॉ.राजेंद्र प्रसाद परिसरात राहणारा अजीज मोहम्मद हा आईएमचा सक्रिय दहशतवादी होता. त्याला बर्‍हाणपूरजवळील भाजीपाला मार्केटजवळ अटक केली.

Deshdoot Digital Dhamaka | देशदूत डिजिटल धमाका
www.deshdoot.com