Friday, April 26, 2024
Homeजळगावभेंडवळ घटमांडणी कार्यक्रम रद्द

भेंडवळ घटमांडणी कार्यक्रम रद्द

शेगाव  –

कोरोना व्हायरस ने जगभर महामारी सदृश्य स्थितीमुळे हाहाकार निर्माण झाला असून महाराष्ट्रासह देशात सध्या सुरू असलेल्या लाँकडाऊन च्या पार्श्वभूमीवर साडेतीनशे वर्षाची जुनी परंपरा असलेली  भेंडवळची मांडणी  दिनांक २६ एप्रिल २०२० रोजी होणारा हा जाहीर कार्यक्रम रद्द करण्यात येणार असल्याने ही परंपरा खंडित होणार आहे.

- Advertisement -

साडेतीनशे वर्षांपूर्वी  बुलडाणा जिल्ह्यातील जळगाव जामोद तालुक्यातील भेंडवळ येथील  वाघ कुळातील श्री चंद्रभान महाराज यांनी प्रारंभ केलेली व मुख्यत्त्वे  कृषिविषयक पिके, पर्जन्यमान ,देशाचे संरक्षण, अर्थव्यवस्था, व्यापार, आरोग्यविषयक तसेच राजकारण याबाबत संपूर्ण सर्वकश वर्षभराचे भाकीत वर्तवणारी  भेंडवळ येथील अक्षय तृतीयेच्या मुहूर्तावर गावालगतच्या पूर्वेकडील वाघ यांच्या शेतात मांडण्यात येणारी घटाची मांडणी व दुसऱ्या दिवशी सूर्योदयापूर्वी घटाचे सूक्ष्म निरीक्षण करून भाकित वर्तवण्याचा  जाहीर कार्यक्रम रद्द करण्यात आल्याची माहिती ही परंपरा चालवणारे व्रतस्थ जीवन व्यतीत करणारे पुंजाजी महाराज वाघ  त्यांचे सहकारी सारंगधर पाटील वाघ यांनी दिली.

भेंडवळ येथील घटमांडणी चे भाकीत एकूण शेतकरी येणाऱ्या खरीप व रब्बी हंगामाचे पेरणी पाण्याचे नियोजन आजही करीत असतात पिढ्यान पिढ्या पासून भाकीत खरे ठरत असल्यामुळे ही मांडणी व भाकितं वरील जनतेचा विश्‍वासदृढ होत गेला, आणि त्यामुळे दरवर्षी अक्षय तृतीयेच्या दुसऱ्या दिवशी भागीत ऐकण्यासाठी आजच्या डिजिटल युगातही शेतकऱ्यांसह सर्व स्तरातील लोकांचे मोठ्या प्रमाणात गर्दी होत असते.

अक्षय तृतीयेला भेंडवळ येथे येण्याचे आव्हान गर्दी टाळण्यासाठी दरवर्षीप्रमाणे होणारा जाहीर भाकीत चा कार्यक्रम रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला लाँकडाऊन शासनाचे आदेशाचे काटेकोरपणे पालन व्हावे यासाठी भाकित वर्तवण्यात चा जाहीर कार्यक्रम रद्द केल्याने नागरिकांनी गर्दी न करण्याचे विनम्र आवाहन भाकीत करते श्री पुंजाजी महाराज वाघ व त्यांचे सहकारी सारंगधर पाटील यांनी शासनास सहकार्य करण्याचे आव्हान केले आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या