बुलढाणा : पोलिस अधिक्षक कार्यालयातील ३९ कर्मचाऱ्यांना केले क्वारंटाईन

शेगांव  – 
तबलिगी जमातच्या धर्मिक कार्यक्रमासाठी कामठी जिल्हा नागपूर येथून आलेल्या व बुलढाणा येथे मागील महिनाभरापासून लॉकडाऊनमुळे अडकलेल्या ११ जणांची तपासणी करण्यात आली असता यामधील तिघांचे रिपोर्ट कोरोना पॉझिटिव्ह आल्याने त्यांच्या संपर्कात आलेल्या ३९ पोलीस अधिकारी व कर्मचारी यांना शेगाव येथे विसावा परिसरात क्वारंटाईन करण्यात आले आहे.
२२ मार्च रोजी लॉकडाऊन झाल्याने परत कामठी जिल्हा नागपूर येथे जाण्यासाठी या ११ ताब्लिगी लोकांनी पोलीस अधीक्षक यांच्याकडे कामठी जाण्याची परवानगी मागितली यावर पोलीस अधीक्षकांनी आधी तपासणी करण्याबाबत जिल्हा शल्य चिकित्सक यांना कळविले त्यानंतर आरोग्य विभागाने त्यांचे स्वाब घेऊन तपासणी केली असता त्यामधील तिघे कोरोना पॉझिटिव्ह आल्याने एकच खळबळ उडाली.
तर कामठी जाण्यासाठी आवश्यक कागदपत्रे व परवानगी प्रोसिजर पार पाडत असताना त्यांच्या संपर्कात आलेल्या पोलीस खात्यातील बुलढाणा येथील ३९ अधिकारी  व कर्मचारी यांना शेगाव येथील विसावा परिसरात क्वारंटाईन करण्यात आले आहे.