Friday, April 26, 2024
Homeधुळेधुळ्यातील दोन खाजगी हॉस्पिटलसह एका लॅबला ठोकले सील

धुळ्यातील दोन खाजगी हॉस्पिटलसह एका लॅबला ठोकले सील

भाजपाचे अन्न पॅकेट वाटप केंद्र बंद : जिल्हाध्यक्षांचे कार्यालयाला देखील कुलूप

धुळे – 

शहरातील भाजपाच्या एका माजी पदाधिकाऱ्याच्या भावाला कोरोना असल्याचे त्याच्या मृत्यनंतर निष्पन्न झाल्याने तमाम भाजपवासीय घाबरले आहेत. त्यामुळे ज्या अन्न वाटप केंद्रावर आणि कार्यालयात तो रोज उपस्थित राहायचा ते तातडीने बंद करण्यात आले आहे.

- Advertisement -

भारतीय जनता पार्टी च्या वतीने लॉक डाऊन कालावधीत गोर गरिबांसाठी मोठे अन्न छत्र उभारण्यात आले होते. या ठिकाणाहून सकाळ, संध्याकाळ मिळून तब्बल 22 हजार अन्न पॅकेट चे प्रभागनिहाय वाटप होत होते.

काल मृत झालेला तरुण याच ठिकाणी सेवाभावाने दररोज मदतीसाठी उपस्थित राहत असे.
मात्र त्याच्या अचानक मृत्यू नंतर तो कोरोना बाधित असल्याचे स्पष्ट झाल्याने आता खळबळ उडाली आहे. हे अन्न छत्र आणि भाजप जिल्हाध्यक्षांचे कार्यालय बंद करण्यात आले आहे.

दोन दवाखाने सील

मृत तरुणावर शहरातील दोन वेगवेगळ्या हॉस्पिटल मध्ये उपचार करण्यात आले. महापालिकेच्या पथकाने हे दोन्ही हॉस्पिटल आणि एका लॅब ला सॅनिटाइझ करून आज सील ठोकले आहे.

बाधित व्यक्तीवर ज्या वॉर्ड मध्ये उपचार झालेत ते वॉर्ड आणि हस्पिटल सील करून संबधीत कर्मचाऱ्यांना कॉरोंटाइन केले असल्याची माहिती मनपाचे सहाय्यक आरोग्य अधिकारी श्री लक्ष्मण पाटील यांनी दिली.

- Advertisment -

ताज्या बातम्या