शहादा : खरेदी विक्री संघा समोरील दुकानांना आग ; जिवीतहानी टळली

शहादा : खरेदी विक्री संघा समोरील दुकानांना आग ; जिवीतहानी टळली

शहादा | ता. प्र. –

शहादे शहरातील खरेदी विक्रीसंघासमोरील बुर्‍हानी हार्डवेअर व राज पाईप या दुकानांना मंगळवारी पहाटे एक वाजून 35 मिनिटांएनी भीषण आग लागल्याने दुकानात असलेल्या बिल्डिंग मटेरियल हार्डवेअर पीव्हीसी पाईप आदी वस्तू जळून खाक झालेल्या आहे.

यात सुमारे दोन ते अडीच कोटी रुपयांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज वर्तविण्यात येत आहे दुकानाला लागलेल्या आगीचे कारण अद्याप समजलेले नाही आगीच्या रुद्र रूप धारण केल्याने जिल्ह्यासह शहादा, शिरपूर, दोंडाईच्या नंदुरबार,व खेतिया येथील अग्निशामक बंबांनी शर्तीचे प्रयत्न केले सकाळपर्यंत दुकानात आगीच्या ज्वाला सुरू होत्या बुर्‍हानी हार्डवेअर व राज पाईप या दुकानाचे मालक आगीचे रूप पाहून सुन्न झाले आहेत दरम्यान, मध्यरात्री लागलेल्या या अग्नितांदवात सुदैवाने कुठलीही जीवितहानी झाली नाही.

शहादा दोंडाईचा रस्त्यावर खरेदी-विक्री संघासमोर मुल्ला इस्माईल कायम राजा व शेख इस्माईल शेख गालिब यांच्या राज पाईप बिल्डिंग मटेरियल व्यवसायाचे दुकान गेल्या अनेक वर्षापासून आहे याच दुकानाला लागून मुल्ला शब्बीर फजले हुसेन इजी यांच्या गुल्हाने हार्डवेअर मटेरियल सप्लायर दुकान आहे मुख्य रस्त्याच्या बाजूला दोघं दुकाने एकमेकांच्या लागून आहेत सोमवारी रात्री साडेआठ नऊ वाजेच्या सुमारास दोघे मालकांनी आपापल्या दुकान बंद करून घरी पोहोचले होते मध्यरात्रीनंतर एक वाजून 35 मिनिटांनी राज पाईप या दुकानातुन आगीच्या ज्वाळा निघतांना शहरातील देवा चौधरी यांना दिसल्या ते इंदूर येथून शहादा येथे घरी जात असताना ती घटना दिसली त्यांनी घटनेची माहिती शहादा पालिकेच्या अग्निशामक दलाला दिली. त्यानंतर त्यांनी मुल्ला इस्माईल राजा व इतरांना या घटनेची माहिती तातडीने दिली.

घटनास्थळी दुकानदार तसेच दाऊदी बोरी समाजातील सर्वच वयोवृद्ध युवक वर्ग घटनास्थळी तातडीने पोहोचले होते त्या दरम्यान शहादा नगरपालिकेची व सातपुडा साखर कारखाना येथील अग्निशामक बंबाना पाचारण करण्यात आले त्यांनीआग विझवण्यासाठी शर्तीचे प्रयत्न सुरू केकेले परंतु आगीचे रुद्ररूप धारण केल्याने आग आटोक्यात आणण्याकरिता नंदुरबार तळोदा शिरपूर दोंडाईचा खेतिया येथील अग्निशामक बंब यांना पाचारण करण्यात आले होते अखेर सकाळीआग विझवण्यात अग्निशामक दलांबा यश आले, तरीही दिवसभर आग नियंत्रणात आणण्यासाठी शहादा पालिकेच्या अग्निशमन दल प्रयत्नरत होते.

रस्त्यालगत राज पाईप या दुकानात बिल्डिंग मटेरियल प्लास्टिक पाईप प्लास्टिकच्या टाक्या लोखंड सेंटरचे मटेरियल यांच्यासह विविध साहित्य दुकानात भरलेले होते त्याचप्रमाणे लगतच बुर आणि हार्डवेअर या दुकानात देखील पीव्हीसी पाईप बिल्डिंग मटेरियल सेंटिंग मशीन प्लास्टिकच्या टाक्या याच्यासह नवीन घराला लागणारे साहित्य यांच्या मालाचा साठा होता पहाटे लागलेला दुकानात आगीमुळे आगीने रौद्ररूप धारण केले होते आधीच रुद्ररूप धारण केल्यामुळे बाजुलाच असलेल्या प्रकाश जैन यांच्या वास्तव्य आहे.

त्याखाली श्रीराम मेडिकल हे औषधालय दुकान आहे सर्वधुर त्यांच्या घरात जात होता वेळी त्यांनी मेडिकल च व घरातील साहित्यांच्या सारवा सर्व केला होता तरीदेखील जैन कुटुंबावर आगीच्या सावट दहशत प्रमाणे सावरत होते आगीने एवढा रूप धारण केले होते की जवळपास असलेल्या वास्तूतील प्लास्टिकच्या पाईप तारा यादेखील गळून पडलेल्या आहेत.

राज्य महावितरण वीज कंपनीने प्रसंगावधान साधून रात्री या परिसरातील विद्युत पुरवठा खंडित केल्यामुळे मोठी होणारी हानी ठरलेली आहे या टनेची माहिती मिळताच दाऊदी बोहरी समाजाचे युवक वर्गापासून वयोवृद्ध माणसापर्यंत तसेच शहरात शहरातील अनेक नागरिक यांनी घटनास्थळी पोहोचण दुकानात असलेला माळ काढण्याच्या शर्तीच्या प्रयत्न करीत होते मात्र आगीने रौद्ररूप धारण केल्याने आगे पासून लोकांना त्रास होऊ लागल्याने लोकांनी काढता पाय घेतला पहाटे सहा वाजेपर्यंत सर्वच अग्निशामक बंबांनी आज वीझवण्यासाठी शर्तीचे प्रयत्न केलेत.

Related Stories

Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com