स्थानिक बातम्या

नंदुरबार : कोंबडा मारला नाही म्हणून पुजा न करणार्‍या पुजार्‍याचा खून

Rajendra Patil

दोघांविरूध्द गुन्हा, एकास अटक

नंदुरबार | प्रतिनिधी

धडगाव तालुक्यातील चोंदवाडे बु.बारीपाडा येथे पुजा न करता घरी परत गेलेल्या पुजार्‍याचा राग आल्याने त्याच्यावर धारदार शस्त्राने डोक्यावर वार करून खून केल्याची घटना घडली. याप्रकरणी दोघांविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला असून एकास पोलीसांनी अटक केली आहे.

याबाबत पोलीस सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, धडगाव तालुक्यातील चोंदवाडे बु.बारीपाडा येथील दिलीप सोन्या पावरा याने त्याच्या घरी पुजेसाठी कोंबडा मारला नाही. म्हणून मान्या माद्या राहसे (वय ५४) यांनी त्याच्याकडे पुजा न करताच स्वतःच्या घरी परत जात होता. याचा राग आल्याने दिलीप सोन्या पावरा, अशोक उर्फ विरसिंग भाज्या पटले यांनी संगनमत करून मान्या माद्या राहसे याच्या डोक्याच्या मागे उजव्या बाजुस कोणत्यातरी हत्याराने वार करून जीवे ठार मारले.

पुरावा नष्ट करण्याच्या इराद्याने आवल्या दल्या पटले यांच्या शेतातून बारीपाडाकडे जाणार्‍या पायवाटेवर इलेक्ट्रीक डी.पी.जवळ मान्या माद्या राहसे याचा मृतदेह टाकून पळुन गेले. याबाबत ठुमला मान्या राहसे रा.चोंदवाडे बु.बारीपाडा,ता.धडगांव यांनी दिलेल्या फिर्यादीवरून दिलीप सोन्या पावरा, अशोक उर्फ विरसिंग भाज्या पटले (दोन्ही रा.चोंदवाडे बु.बारीपाडा,ता.धडगांव) यांच्याविरूध्द भादवि कलम ३०२, २०१, ३४ प्रमाणे धडगांव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यातील अशोक उर्फे विरसिंग भाज्या पटले याला पोलीसांनी अटक केली आहे. पुढील तपास पोसई एस.बी.सोनवणे करीत आहेत.

Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com