करोना इफेक्ट : १०० वे नाट्य संमेलन पुढे ढकलले
स्थानिक बातम्या

करोना इफेक्ट : १०० वे नाट्य संमेलन पुढे ढकलले

Rajendra Patil

जगात करोना व्हायरसने हाहाकार माजवला असून याचा फटका सर्वांनाच बसत आहे. यात क्रिकेट खेळापासून तर सिनेसृष्टीलाही बसला आहे.

देशासह महाराष्ट्रात मोठमोठे कार्यक्रम रद्द होत आहेत. यातच अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेने १०० वे नाट्य संमेलन आता पुढे ढकलण्याचा निर्णय घेतला असल्याचे नाट्य परिषदेचे अध्यक्ष नवनाथ कांबळी यांनी जाहीर केले आहे.

दि.२७ मार्च पासून सुरू होणाऱ्या १०० वे नाट्य संमेलन आता अनिश्चित काळासाठी पुढे ढकलले आहे. सांगली येथे दि.२७ मार्च ते १४ जून या दरम्यान नाट्य संमेलन होणार होते. कोणत्याही ठिकाणी गर्दी न करण्याचे आवाहन केंद्रासह राज्य शासनाने केले आहे.

यामुळेच नाट्य परिषदेने हे संमेलन पुढे ढकलण्याचा निर्णय घेतला आहे. नाट्य संमेलन आता केव्हा होणार याबाबत अद्याप माहिती दिलेली नाही.

Deshdoot
www.deshdoot.com