Video : ‘कोरोना’ जनजागृती : क्रांतीवीर चित्रपटातील ‘नाना’चा ‘एडिटींग’ डॉयलाग होतोय फेमस
स्थानिक बातम्या

Video : ‘कोरोना’ जनजागृती : क्रांतीवीर चित्रपटातील ‘नाना’चा ‘एडिटींग’ डॉयलाग होतोय फेमस

Rajendra Patil

जळगाव –

जगभरात ‘कोरोना’ व्हायरसने थैमान घातले असून भारतातही याचा प्रभाव वाढत असल्याने केंद्र सरकारने संपूर्ण देशभर ‘लॉकडाऊन’ केले आहे. एव्हढेच नव्हे तर विमानसेवा, रेल्वे सेवा व इतरही प्रवासी वाहतुक बंद केली आहे. तसेच देशभर संचारबंदी लागू केली आहे. या संसर्गजन्य आजारावर मात करण्यासाठी विविध प्रकारच्या उपाययोजना व जनजागृती करण्यात येत आहे.

कोरोना व्हायरसच्या जनजागृतीसाठी ‘क्रांतीवीर’ चित्रपटातील नाना पाटेकर यांचा सुप्रसिध्द डॉयलॉग (नानांच्या सेम आवाजात) एडिटींग करून कोरोना जनजागृतीसाठी सोशल मिडीयावर सध्या जोरदार व्हायरल होत आहे. हा एडिटींग व्हीडीयो ज्याने कोणी बनवला असेल त्याचेही कौतुकच व्हायला हवे. व या व्हीडीयोद्वारे तरी जनमानसात कोरोना व्हायरस विषयी जनजागृती होईल अशी आशा बाळगूया. सोशल मिडीयावर अनेक प्रकारचे चुकीचे मेसेज पसरविण्यापेक्षा चांगले मेसेज टाकणे गरजेचे आहे.

Deshdoot
www.deshdoot.com