आनंदाची बातमी ; केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात वाढ
स्थानिक बातम्या

आनंदाची बातमी ; केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात वाढ

Rajendra Patil

दिल्ली
केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी असून केंद्रीय मंत्रिमंडळ बैठकीत झालेल्या निर्णयानुसार केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात ४ टक्के वाढ झाली आहे. आज झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत विविध विषयांवर चर्चा करण्यात आली. यात करोनाच्या संकटावर मात करण्यासाठी करण्यात येत असलेल्या उपाययोजनांबद्दल चर्चा झाली.

मागील वर्षी केंद्राने महागाई भत्त्यात ५ टक्के वाढ केली होती. यावेळी पुन्हा चार टक्के वाढ केल्याने हा भत्ता आता २१ टक्के झाला आहे.

Deshdoot
www.deshdoot.com