जळगाव : शेतकरी कर्जमाफी : २४५ लाभार्थ्यांची यादी जाहिर
स्थानिक बातम्या

जळगाव : शेतकरी कर्जमाफी : २४५ लाभार्थ्यांची यादी जाहिर

Rajendra Patil

कर्जमुक्ती अंतर्गत पहिल्या टप्प्यात हिंगोणा व कराडीतील लाभार्थी ठरले पात्र

महात्मा ज्योतीराव फुले कर्जमुक्ती योजनेंतर्गत मुद्दल व व्याजासह थकबाकीदार शेतकर्‍यांचे दोन लाख रूपयांपर्यतचे पीककर्ज माफ करण्यात येणार असल्याचे नागपूर येथे झालेल्या हिवाळी अधिवेशनात दि.२७ डिसेंबर २०१९ रोजी महाविकास आघाडी सरकारतर्फे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी जाहिर केले होते.

त्यानुसार सोमवार दि.२४ रोजी दुपारी एक वाजता मुख्मंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजीत पवार यांच्या उपस्थितीत महात्मा ज्योतीराव फुले कर्जमुक्ती योजनेंतर्गत लाभार्थ्याची पहिली यादी करण्यात आली.

यात यावल तालुक्यातील हिंगोणा येथील १४४ तर पारोळा तालुक्यातील कराडी येथील १०१ अशा या दोन गांवातील २४५ लाभार्थी शेतकर्‍यांची कर्जमुक्ती योजनेची यादी जाहिर करण्यात आली.

यात यावल तालुक्यातील हिंगोणा येथील वासुदेव सुधाकर वारके यांना ८५७५९ रूपये तर पारोळा तालुक्यातील कराडी येथील देवचंद नामदेव वानखेडे यांना ५३५३७ स्पयांची कर्जमाफी जिल्हा बँकेच्या स्थानिक विकासोंतर्गत जाहिर करण्यात आली असल्याचे प्रमाणपत्र देउन घोषीत केले असल्याची माहिती जिल्हा उपनिबंधक सहकार विभागाच्या सूत्रांनी दिली आहे.

Deshdoot
www.deshdoot.com