जळगाव : कांचननगरातील बालिकेचा मृतदेह आढळला
स्थानिक बातम्या

जळगाव : कांचननगरातील बालिकेचा मृतदेह आढळला

Balvant Gaikwad

Balvant Gaikwad

जळगाव
कांचननगरातील अपहरण झालेल्या 15 वर्षीय बालिकेचा मृतदेह आसोदा रेल्वे गेटजवळील रेल्वे रुळाच्या नऊ मीटर अंतरावरील झुडपाजवळ आढळला.

ही घटना रेल्वे गेटमन सनकलाल दुबे यांच्या लक्षात सोमवारी सकाळी आली. या मुलीचे अपहरण झाल्याप्रकरणी दि.15 रोजी शनिपेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यानंतर सोमवारी सकाळी तिचा मु्तदेह आढळला.

ही बालिका शहरातील एका शाळेत दहावीच्या वर्गात होती. तिला दहावीच्या परीक्षेचे टेन्शन होते. 15 रोजी प्रँक्टीकल होते. याच दिवशी ती पहाटे 4 वाजेच्या सुमारास घरातून बेपत्ता झालेली होती.

या वेळी घरातील सर्व जण झोपलेले होते. दरम्यान, याप्रकरणी घातपाताचीही संशय व्यक्त होत आहे. या घटनेमुळे शहरात घबराटीचे वातावरण निर्माण झाले आहे.

Deshdoot
www.deshdoot.com