जळगाव : जिल्ह्यातील सर्व सिमा बंद ; आदेशाचे पालन करा -जिल्हाधिकारी
स्थानिक बातम्या

जळगाव : जिल्ह्यातील सर्व सिमा बंद ; आदेशाचे पालन करा -जिल्हाधिकारी

Rajendra Patil

जळगाव –
कोरोना विषाणूमुळे पसरत असलेला आजार हा साथीचा संसर्गजन्य आजार म्हणून घोषित केलेला आहे. तसेच करोना विषाणूचा प्रसार भारतात, महाराष्ट्रात झपाट्याने पसरत आहे. यामुळे संसर्ग वाढण्याची शक्यता लक्षात घेता त्यावर तत्काळ नियंत्रण आणण्यासाठी व विषाणू संसर्गात अधिक वाढ होऊ न देता उपाययोजना म्हणून जिल्हाधिकारी अविनाश ढाकणे यांनी दिलेल्या आदेशानुसार फौजदारी प्रक्रिया संहिता १९७३ चे कलम १४४ अन्वये आदेश दिले आहेत.

जळगाव जिल्ह्यात करोना विषाणू (कोव्हिड १९) चा प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाय योजनांचा भाग म्हणून पारीत केलेल्या आदेशामध्ये –
१) जळगाव जिल्ह्यातील सर्व सिमा तत्काळ बंद करण्यात येत आहे.
२) पोलीस अधिक्षक जळगाव व उपप्रादेशिक परिवहन अधिकारी जळगाव यांनी संयुक्तरित्या जळगाव जिल्ह्यातील सर्व सिमावर्ती ठिकाणी नाकेबंदी करून वाहनांची तपासणी करूनच त्यांना प्रवेश व निर्गमन करण्यास प्रतिबंध करावा.
३) जिल्ह्यातील कोणत्याही नागरीकास अत्यावश्यक कारण वगळता बाहर जिल्ह्यात जाण्यास मनाई करण्यात येत आहे.
४) जिल्ह्यातील नागरीक नसलेल्या कोणत्याही व्यक्तीस जिल्ह्यात अत्यावश्यक कारणाशिवाय प्रवेश करण्यास मनाई करण्यात येत आहे.

सदर आदेश हा शासकीय, निमशासकीय वाहने, अंम्ब्युलन्स, अग्निशमन वाहने, अत्यावश्यक व जिवनावश्यक वस्तू, सेवा, मनुष्यबळ पुरविणारी वाहने व वाहतूक व्यवस्था उदा. पिण्याचे पाणी, दूध, फळे, भाजीपाला, औषधी, धान्य, वैद्यकीय उपकरणे, टेलीफोन व इंटरनेट सेवा, हॉस्पिटलसाठी आवश्यक असणारे साधन सामुग्री इ. वस्तु व सेवा (वाहनांच्या दर्शनी भागात आवश्यक ते स्टिकर, बोर्ड लावणे बंधनकारक राहील) प्रसार माध्यमांची वाहने, विद्युत विभागाशी संबंधित उपकरणे, पेट्रोल, गॅस, डिझेल इ. पुरविणारी वाहने व वाहतूक व्यवस्था. असा आदेश जिल्हाधिकारी जळगाव यांनी दि.२३ मार्च २०२० रोजी दिला आहे.

Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com