जळगाव : आठ वर्षांच्या बालिकेवर ६० वर्षाच्या वृध्दाने केला अत्याचार
स्थानिक बातम्या

जळगाव : आठ वर्षांच्या बालिकेवर ६० वर्षाच्या वृध्दाने केला अत्याचार

Rajendra Patil

जळगाव | प्रतिनिधी
घराजवळ खेळत असलेल्या आठ वर्षाच्या बालिकेवर एका ६० वर्षीय वृध्दाने अत्याचार केला. त्या वृद्धास बालिकेच्या पालकांनी पकडून पोलिसांच्या ताब्यात दिले. ही घटना जिल्हापेठ पोलीस ठाण्यात हद्दीतील परिसरात रविवारी दुपारी १ वाजेच्या सुमारास घडली.

ही बालिका कुत्र्याच्या पिल्लांसोबत अंगणात खेळत होती. त्या परिसरातील रवींद्र पुना रंधे (वय ६०) याने त्या बालिकेला गोड बोलून घरात बोलावले आणि तिच्यावर अत्याचार केले.

या घटनेनंतर त्या मुलीला त्रास सहन होत नव्हता. तिने तिला होत असलेल्या त्रासबद्दल आजीला सांगितले. तेव्हा हा प्रकार उघडकीस आला. बालिकेने त्या वृद्धाच्या गैरकृत्याबाबत पालकांना सांगितले. त्यानंतर पालकांनी त्याला पकडून जिल्हापेठ पोलीसांच्या ताब्यात दिले.

याप्रकरणी पीडित बालिकेच्या आईच्या फिर्यादीवरुन जिल्हापेठ पोलीस ठाण्यात पोक्सो कायद्यानुसार रवींद्र पुना रंधे याच्याविरुद्ध गुन्हा दाखल झााला आहे. तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक दिलीप शिरसाठ करीत आहे.

Deshdoot
www.deshdoot.com