धुळे जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदी तुषार रंधे, उपाध्यक्षपदी कुसुमबाई निकम
स्थानिक बातम्या

धुळे जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदी तुषार रंधे, उपाध्यक्षपदी कुसुमबाई निकम

Balvant Gaikwad

Balvant Gaikwad

धुळे |  प्रतिनिधी

जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदी भाजपाचे तुषार रंधे तर उपाध्यक्षपदी भाजपाच्या कुसुमबाई कामराज निकम यांची निवड झाली आहे. जिल्हा परिषदेच्या सभागृहात आज दुपारी विशेष सभा झाली.

प्रथम अर्जांनी छाननी त्यानंतर माघारीसाठी वेळ देण्यात आली. त्यानंतर प्रथम अध्यक्ष पदासाठी हात उंचावून मतदान घेण्यात आले. त्यात तुषार रंधे यांना ४० तर कॉंग्रेसचे विश्‍वनाथ बागुल यांना १६ मते मिळाली. सर्वांधिक मते मिळाल्याने तुषार रंधे यांची अध्यक्षपदी निवड जाहिर करण्यात आली. तर उपाध्यक्षपदासाठी देखील हात उंचावून मतदान घेण्यात आले.

भाजपाच्या कुसुमबाई निकम यांना ४० व कॉंग्रेसचे पोपटराव सोनवणे यांना १६ मते मिळाली. उपाध्यक्षपदी कुसुबाई निकम यांची निवड जाहिर करण्यात आली. निवड जाहिर होताच भाजपाच्या पदाधिकारी व कार्यकत्यांनी ढोल ताश्याच्या गजरात गुलालाची करीत फटाके फोडून एकच जल्लोष केला.

Deshdoot
www.deshdoot.com