धुळे येथे राज्यातील सर्वात कमी ५.२ तापमानाची नोंद
स्थानिक बातम्या

धुळे येथे राज्यातील सर्वात कमी ५.२ तापमानाची नोंद

Balvant Gaikwad

धुळ्यात थंडीचा कहर, पारा 5.2 अंशांवर

धुळे –

गेल्या दोन ते तीन दिवसांपासून गायब झालेली थंडी पुन्हा परतली आहे. तापमानात पुन्हा घसरण झाली असून आज दि.१० रोजी कृषी महाविद्यालयात 5.2 अंश सेल्सिअसची नोंद झाली आहे.

त्यामुळे थंडीने धुळेकर अक्षरशा गारठले आहेत. काल रात्रीपासून थंडीने कहर केला आहे. थंडगार वाऱ्या मुळे धुळेकरांना हुडहुडी भरली आहे. त्यामुळे भर दुपारी ही नागरिकांना उबदार कपडे परिधान करावे लागत आहे.

Deshdoot
www.deshdoot.com