पांगरी जवळ अपघातात एक ठार; मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची मेहुणी जखमी
स्थानिक बातम्या

पांगरी जवळ अपघातात एक ठार; मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची मेहुणी जखमी

Gaurav Pardeshi

Gaurav Pardeshi

सिन्नर | प्रतिनिधी

सिन्नर तालुक्यातील वावी पोलिस ठाणे हद्दीत पांगरी गावाजवळ चालकाचे नियंत्रण सुटल्याने महिंद्रा कंपनीची झायलो कार रस्यालगतच्या नाल्यात उलटली. या अपघातात एक जण ठार झाला असून मुख्यमंञी उध्दव ठाकरे यांच्या मेहुणीसह 5 प्रवासी जखमी झाले आहे.

मंगळवारी (दि.14) रात्री 9च्या सुमारास हा अपघात झाला. अजय विश्वनाथ कारंडे असे मृताचे नाव आहे. मुख्यमंञी ठाकरे यांच्या मेहुणी अमृता सिंगारपूर, मीना कारंडे, मनिषा मिश्रा, अभिषेक सिंग यांच्यासह जखमींना उपचारांसाठी नाशिकच्या अपोलो हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे.

हे सर्व जण ठाणे येथून शिर्डी येथे साईबाबांच्या दर्शनासाठी आलेले होते. दर्शन झाल्यानंतर झायलो कारने (क्रमांक एमएच. 04 इटी. 3727) ठाण्यातकडे परतत असताना पांगरीजवळ हा अपघात झाला. जखमींना सिन्नरच्या यशवंत हॉस्पिटलमध्ये उपचारांसाठी दाखल करण्यात आले होते.अजय कारंडे यांची प्रकृती चिंताजनक असल्याने त्यांच्यासह सर्व जखमींना प्राथमिक उपचारांनंतर नाशिक येथे हलविण्यात आले.

याबाबत वावी पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक रणजीत गलांडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार संदीप शिंदे अधिक करत आहेत.

Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com