चाळीसगाव : वाघडू शिवारात झोपडीला लागलेल्या आगीत वृध्दाचा मृत्यू
स्थानिक बातम्या

चाळीसगाव : वाघडू शिवारात झोपडीला लागलेल्या आगीत वृध्दाचा मृत्यू

Rajendra Patil

तालुक्यातील वाघडू शिवारातील शेतात असलेल्या झोपडीला रात्रीच्या वेळी आग लागून झोपडे संपूर्णपणे जळून खाक झाले असून यात देवराम नंदराम पाटील (वय ७०) हे जळून मयत झाले असल्याचे निदर्शनास आले आहे.

देवराम पाटील हे गेल्या पंधरा वर्षांपासून शेतातच झोपडीत राहत असल्याचे समजले असून रात्री थंडी असल्याने शेकोटी केल्यामुळे या शेकोटीची आग झोपडीला लागल्याने ही झोपडी जळून खाक झाली असून यात देवराम पाटील यांचा मृत्यू झाले असल्याचे सांगितले जात आहे.

नुकतेच घटनास्थळी चाळीसगाव चे पोलीस पथक पोहोचले असून पंचनामा व इतर सोपस्कार पूर्ण केल्यावर अधिक खुलासा होऊ शकेल. घटनेचा पंचनामा करून सदर कुटूंबाला तत्काळ मदत करण्याच्या सुचना आ.मंगेश चव्हाण यांनी तहसिलदार अमोल चव्हाण यांना दिल्या आहेत.

Deshdoot
www.deshdoot.com