चाळीसगाव : नगरपालिकेच्या रोखपालास तीन हजाराची लाच स्विकारताना अटक
स्थानिक बातम्या

चाळीसगाव : नगरपालिकेच्या रोखपालास तीन हजाराची लाच स्विकारताना अटक

Rajendra Patil

जळगाव/चाळीसगाव | प्रतिनिधी
चाळीसगाव नगरपालिकेत फर्निचरचे बिल व डिपॉझिट काढून देण्याच्या मोबदल्यात तीन हजार रुपयांची लाच स्वीकारणार्‍या रोखपालास बुधवार दि.२६ रोजी नाशिकच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने रंगेहाथ पकडले.

याबाबत त्याच्या विरुद्ध चाळीसगाव शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. तक्रारदाराचे चाळीसगाव नगरपरिषदकडे असलेले फर्निचरचे बिल काढून देण्याच्या मोबदल्यात व फर्निचरच्या कामासाठी नगरपरिषदकडे जमा असलेली डिपॉजिट रक्कम परत मिळवून देण्याच्या मोबदल्यात नगरपालिकेतील रोखपाल संदीप पंडितराव खैरनार (वय ५२, रा.दत्तवाडी, दत्तमंदिर जवळ, चाळीसगाव) याने १७ फेब्रुवारी रोजी तीन हजार रुपयांची मागणी केली होती.

याबाबत तक्रारदाराने नाशिक येथील लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली. त्यानुसार रोखपालास तीन हजार रुपयांची लाच स्वीकारताना रंगेहाथ पकडल. त्याच्या विरुद्ध चाळीसगाव शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Deshdoot
www.deshdoot.com