Sunday, April 28, 2024
Homeक्रीडाक्रिकेट खेळावर करोनाचे सावट : खेळाडूची झाली वैद्यकीय चाचणी

क्रिकेट खेळावर करोनाचे सावट : खेळाडूची झाली वैद्यकीय चाचणी

सिडनी – वृत्तसंस्था

करोना व्हायरसने जगात हाहाकार माजवला आहे. यामुळे जगभरात भीतीचे सावट पसरले असताना आता तर क्रिकेट खेळावरही करोनाचे सावट पसरले असल्याचे निदर्शनास आले आहे. ऑस्ट्रेलियाच्या राष्ट्रीय संघाकडून खेळणाऱ्या एका क्रिकेटपटूची खबरदारी म्हणून करोना व्हायरसची चाचणी घेण्यात आली आहे.

- Advertisement -

ऑस्ट्रेलिया संघातील वेगवान गोलंदाज केन रिचडसन याची वैद्यकीय चाचणी झाल्याने न्यूझीलंडविरूध्द होणाऱ्या पहिल्या वनडे सामन्याला त्यास मुकावे लागणार आहे. केन याने काही दिवसांपूर्वी दक्षिण आफ्रिकेचा दौरा केला होता.

ऑस्ट्रेलियन संघ मायदेशी परतल्यानंतर केनने वैद्यकीय टीमला आजारी असल्याचे सांगितले. त्याच्या करोना व्हायरसची लक्षणे आढळल्याने ? त्याची ताबडतोब वैद्यकीय चाचणी करण्यात आली. त्याच्यापासून अन्य खेळाडूंना वेगळे केले आहे. त्याने आंतरराष्ट्रीय प्रवास केल्याने त्याची करोना व्हायरसची चाचणी घेतल्याचे ऑस्ट्रेलियन क्रिकेट बोर्डाने सांगितले आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या