जळगाव : तांबापूरमधील तरुणाचा खून
स्थानिक बातम्या

जळगाव : तांबापूरमधील तरुणाचा खून

Rajendra Patil

जळगाव-

एमआयडीसी परिसरातील कस्तुरी हॉटेल परिसरात तांबापूरमधील सुमारे 40 वर्षीय बबलू हटकर या तरुणावर धारदार शस्राने वार करुन त्याचा खून झाला आहे.

ही घटना बुधवारी रात्री 10 वाजेच्या सुमारास घडल्याचा अंदाज आहे. हा खून पूर्ववैमनस्यातून झाला की, अन्य कारणावरुन, याबाबत पोलीस शोध घेत आहेत.

घटनेची माहिती मिळताच एमआयडीसी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. मारेक-याचा शोध सुरू असल्याचे पोलिसांनी सांगितले.

Deshdoot
www.deshdoot.com