धुळे : पं.स.चा कंत्राटी अभियंता एसीबीच्या जाळ्यात
स्थानिक बातम्या

धुळे : पं.स.चा कंत्राटी अभियंता एसीबीच्या जाळ्यात

Rajendra Patil

पंतप्रधान आवास योजनेचे घरकुल मंजूर असून बांधलेल्या घरकुलाचे छायाचित्र काढून, नजर तपासणी करून मूल्यांकन सादर करण्यासाठी दोन हजारांची लाच स्वीकारताना धुळे पंचायत समितीच्या ग्रामीण गृह निर्माण कंत्राटी अभियंत्याला आज रंगेहात पकडण्यात आले आहे.

धुळे एसीबीच्या पथकाने आज सकाळी ही कारवाई केली. कंत्राटी अभियंता भूषण शामराव वाघ (वय २५ रा. श्रमसाफल्य कॉलनी, वलवाडी देवपूर, धुळे) याने वरील कामासाठी शेमल्या (ता. शिरपूर) येथील तक्रारदाराकडे दि.२४ फेब्रुवारी रोजी लाचेची मागणी केली होती.

त्यामुळे तक्रारदाराने धुळे एसीबीकडे तक्रार केली होती,  त्यानुसार एसीबीच्या पथकाने अभियंता भुषण वाघ याला तडजोडी दोन हजारांची
लाच स्विकारल्यानंतर रंगेहाथ पकडले.

Deshdoot
www.deshdoot.com