चाळीसगाव : मालेगाव येथील कोरोनाग्रस्त रुग्णाच्या संपर्कातील सहा संशयितांची तपासणी
स्थानिक बातम्या

चाळीसगाव : मालेगाव येथील कोरोनाग्रस्त रुग्णाच्या संपर्कातील सहा संशयितांची तपासणी

Rajendra Patil

चाळीसगाव | प्रतिनिधी

मालेगाव येथे कोरोनाबाधीत रुग्ण आढळले असून त्यापैकी एकाचा मृत्यू झाला आहे. मृत्यू झालेला कोरोना बाधित रुग्णाच्या अंत्ययात्रेसाठी चाळीसगावातील एकाच परिवारातील पाच जण गेले होते. तसेच मृत्यूपूर्वी देखील एक सदस्य त्याला भेटण्यासाठी गेल्याची माहिती मिळाली आहे.

त्यामुळे हे सर्वजण कोरोनाबाधित रुग्णाच्या संपर्कात आल्याच्या संशयावरुन शहरातील एका सोसोसाटीतील सहा जणांना पोलिसांनी खबदारीसाठी गुरुवारी सकाळी ताब्यात घेवून, तात्काळ तपासणीसाठी जळगाव येथील जिल्हा रुग्णालयात पाठविण्यात आल्याची माहिती चाळीसगाव ग्रामीण रुग्णालाचे वैद्यकिय आधिकारी डॉ.बी.पी.बाविस्कर यांनी दिली आहे.

चाळीसगाव शहरात राहणारे एका परिवाराचे नातलग मालेगाव येथे राहतात. मालेगाव येथे पाच कोरोना बाधित रुग्ण आढळले आहेत. त्यातील एका ५७ वर्षीय कोरोनाग्रस्त रुग्णांचा आज मृत्यू झाला. चाळीसगावातील या परिवाराचे कोरोनाग्रस्त मयाताशी जवळचे संबंध होते.

मयत रुग्णाच्या अंत्यविधीसाठी मालेगाव येथे राहणारे एका परिवारातील तीन पुरुष व दोन महिला गेल्या होत्या. तसेच गेल्या महिनाभरापूर्वी देखील या परिवारातील एक सदस्य कोरोना बांधिताला भेटण्यासाठी गेला होता. गुरुवारी याबाबतची गुप्त माहिती चाळीसगाव पोलिसांना मिळताच खबरदारी म्हणून पोलिसांना एकाच परिवारातील दोन महिला, तीन पुरुष व त्यांना मालेगाव येथे घेवून जाणारा रिक्षा चालक अशा सहा संयशियतांना ताब्यात घेतले.

त्यांची येथील ग्रामीण रुग्णालयात वैद्यकिय तपासणी केल्यानतंर, पुढील तपासणीसाठी तात्काळ जळगाव येथील जिल्हा रुग्णालयात तपासणीसाठी पाठविण्यात आले आहे. येथे त्यांच्या कोरोना विषाणू संबंधी तपासणी केली जाणार आहे. त्याचा कोरोना विषाणू संबंधीत तपासणीचा अहवाल येईपर्यंत क्वारंटाईन करण्यात येणार असल्याची माहिती डॉ.बी.पी.बाविस्कर यांनी दिली आहे.

दरम्यान चाळीसगाव पोलिसांना संशयितांना ताब्यात घेताचा चाळीसगाव नगरपषिदेच्या वतीने सदर सोसायटीत रहिवास असलेले संपूर्ण घराला व परिसरात फवारणी करुन निर्जुंतुकीकरण केले आहे. याप्रसंगी न.पा.चे आधिकारी संजय गोयर व कर्मचारी उपस्थित होते.

Deshdoot Digital Dhamaka | देशदूत डिजिटल धमाका
www.deshdoot.com