अमळनेर : टाकरखेडा येथे विहिरीत पडून मातेसह दोन मुलांचा मृत्यू
स्थानिक बातम्या

अमळनेर : टाकरखेडा येथे विहिरीत पडून मातेसह दोन मुलांचा मृत्यू

Rajendra Patil

अमळनेर / टाकरखेडा – प्रतिनिधी

तालूक्यातील टाकरखेडा येथे विहिरीत पडून मातेसह दोन मुलांचा मृत्यू झाल्याची ह्रदयद्रावक घटना आज दि.२१ रोजी दुपारी ११.३० ते १२ चे सुमारास घडली.

सौ.भारती सचिन पाटील (वय ३२) व गजानन (वय १२) तसेच चि.स्वामी (वय ७) या तिघांचा विहिरीत बूडून मृत्यू झाला. टाकरखेडा शिवारात त्यांचेच स्वतःचे सुमारे ७० फूट खोल विहिरीत पडलेल्या त्या तिघांचा मृतदेह काढण्यासाठी ग्रामस्थ प्रयत्न करित आहे, विहिरीत सुमारे ३५ फूट खोल पाणी असून मोटारीने पाणी उपसण्याचे काम सूरू आहे.

तिघांचे मयताचे कारण समजून आले नाही पती सचिन देखील बाजूच्या शेतात काम करित होता विहिरीत पडण्याचे आवाजाने तो पळत आल्याने वाचवा वाचवा करीत त्याने ग्रामस्थांना गोळा केले.

तोपर्यंत वेळ निघून गेली होती सदर मातेला दोन्ही मूलेच होती सचिनच्या वंशांचे दिवे मालवल्याने त्याची दातखिळीच बसून गेली सौ.भारतीचे माहेर भालेर (ता.नंदुरबार) येथील असून सचिनचा शेती हा व्यवसाय आहे.

Deshdoot
www.deshdoot.com