रेल्वे या कालावधीपर्यंत बंद
स्थानिक बातम्या

रेल्वे या कालावधीपर्यंत बंद

Balvant Gaikwad

कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी रेल्वे सेवा 14 एप्रिलपर्यंत बंद करण्यात आली होती. आता लॉकडाऊन पार्ट-2 म्हणजे 3 मे पर्यंत सर्व रेल्वे सेवा बंद राहणार आहे.

या कालावधीत सर्वच पॅसेंजर, मेल एक्सप्रेस, मेमो ट्रेन, सर्व ब्रांच लाईन, दुरंतो एक्सप्रेस, लोकल ट्रेन रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. केवळ जीवनावश्यक वस्तूं व पार्सल गाड्या चालू राहणार आहे.

आरक्षण कार्यालय बंद

रेल्वे गाड्या गाडिया पूर्णतः रद्द करण्यात आल्या असल्यामुळे भुसावळ विभागातील सर्व स्थानकांवरील आरक्षण व अनारक्षित तिकीट केंद्र 3 मे पर्यत बंद राहणार आहे.

या दरम्यान प्रवाशांद्वारे काढण्यात आलेले आरक्षण तिकिटांची रक्कम 3 मे नंतर आरक्षण कार्यालयातून परत करण्यात येणार आहे. ज्या गाड्या रद्द आहेत त्या गाड्यांच्या तिकिटांची पूर्ण रक्कम मिळणार आहे.

Deshdoot
www.deshdoot.com