Wednesday, April 24, 2024
HomeUncategorizedभुसावळ : डोंबिवली येथून पळून आलेल्या एकाला पाठविले रुग्णालयात

भुसावळ : डोंबिवली येथून पळून आलेल्या एकाला पाठविले रुग्णालयात

विल्हाळे तालुका भुसावळ  येथे काल मुंबई उपनगर डोबीवली येथुन  तरुण आल्याची माहिती  पोलिसांना मिळाली  पोलिसांनी लागलीच  गाव गाठून  संबंधीत तरुणाची चौकशी करून त्याला जळगाव येथे  हे कोविड  रुग्णालयात पाठवले आहे  ,तर  त्याच्याविरुद्ध  वरणगाव  पोलिसात गुन्हा नोंदवण्यात आला.
मुंबई उपनगर डोबीवली येथुन 27 वर्षीय युवक काल विल्हाळे तालुका भुसावळ येथे आल्याची माहिती मुंबई पोलिसांनी वरणगाव पोलिसांना दिली यावेळी सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक संदीपकुमार बोरसे व   भोये सह त्यांच्या सहकाऱ्यांनी गाव गाठून संबंधित तरुणाची चौकशी केली असता त्याच्याकडे कोणत्याही प्रकारची पास आढळून आले नाही.
तसेच तो मिळेल त्या वाहनाने व पायी चालत आलेला असल्याने त्याने जिल्हा बंदीचा व २००५ आपत्ती व्यवस्थापन कायद्याचे उल्लघन केल्याने त्याच्या विरुद्ध वरणगांव पोलीसात वेल्हाळा ग्रामसेवक प्रशांत तायडे यांच्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला .
त्याला लागलीच जळगाव येथील कोविंड रुग्णालयात तपासणीसाठी पाठवले आहे तर त्या तरुणाला जळगाव येथे विलगीकरण कक्षात ठेवण्यात आले आहे . वरणगाव पोलिसांत जिल्हाबंदी संबंधात दाखल गुहा हा राज्यात पहिला असल्याचे सांगण्यात आले.
दरम्यान, तालुक्यातील किन्ही येथील तीन नागरीकांनी अमळनेर येशील कोरोना रग्णाच्या अंत्यसंस्कारात सहभाग नोंदविला होता. व ते गावात सर्वत्र वावरत होते त्यांनाही जिल्हा रूग्णालयात दाखल करण्यात आल्याचे समजते.
- Advertisment -

ताज्या बातम्या