Sunday, April 28, 2024
Homeनाशिकमुंबईत होम क्वारंटाईन दीराने घेतली होती भेट; बजरंगवाडी मृत महिलासंदर्भातील चौकशीत खुलासा

मुंबईत होम क्वारंटाईन दीराने घेतली होती भेट; बजरंगवाडी मृत महिलासंदर्भातील चौकशीत खुलासा

नाशिक । प्रतिनिधी

नाशिक शहरात करोना बाधीत रुग्णांचा आकडा आता 19 झाला असुन एका रुग्णांचा मृत्यु झाल्याचे समोर आले आहे. मंगळवारी सायंकाळी शहरात दोन रुग्ण पॉझिटीव्ह आढळल्यानंतर हा आकडा वाढला असुन यामुळे शहरातील प्रतिबंधीत क्षेत्रात वाढ होणार आहे. नाशिक शहरात करोनाचा पहिला मृत्यु बजरंगवाडीतील महिलेचा झाला असुन तिच्यासंदर्भातील चौकशीत काही दिवसापुर्वी मुंबईतील प्रतिबंधीत क्षेत्रात होम क्वारंटाईन असलेला दीर तिला भेटून गेल्याची माहिती समोर आली आहे. याच भेटीतून तिला संसर्ग झाल्याचे आता आधोरेखीत झाले आहे.

- Advertisement -

शहरातील करोनाचा पहिला मृत्यु म्हणुन बजरंगवाडीतील 20 वर्षीय गरोदर महिलेची नोंद झाली आहे. मुबंईतील एका प्रतिबंधीत क्षेत्रात होम क्वारंटाईन असलेला तिचा दीर मृत्युच्या आठवडा भरापुर्वी तिला भेटायला येऊन गेला होता. यातून तिला संसर्ग झाल्याची शक्यता आता वर्तविली जात असुन या अनुषंगाने आता महापालिका वैद्यकिय विभागाकडुन चौकशी सुरू झाली आहे.

शहरातील जुने नाशिक भागातील नानावली भागात राहणारी आणि नंतर बजरंगवाडीत राहण्यासाठी गेलेल्या या महिलेचा विवाह सिन्नर येथे झाला होता. एक महिन्यापुर्वी ती नाशिकला बाळंतपणासाठी माहेरी आली होती.

24 एप्रिल 2020 रोजी ती महापालिकेच्या रुग्णालयात तपासणीसाठी गेली होती. तिच्या तपासणीत तिला उच्च रक्तदाबाचे निदान झाल्यानंतर तिस डॉ. वसंतराव पवार मेडीकल कॉलेजला संदर्भीत करण्यात आले होते. परंतु ही महिला डॉ. पवार मेडीकल कॉलेजला न जाता घरी गेली आणि कोणतेही उपचार घेतले नाही. तसेच तिच्या मृत्युपुर्वी मुबंईतील करोना प्रतिबंधीत भागात होम क्वारटाईन असलेले तिचा दीर तिला भेटण्यासाठी घरी आला होता. नंतर तो मुंबईला परत गेला.

2 मे रोजी या महिलेच्या पोटास दुखु लागल्याने आणि दम लागत असल्याने सध्याकाळी तिच्या कुटुबिंयांनी तिला जिल्हा शासकिय रुग्णालयात दाखल केले होते. यावेळी तिचा करोना चाचणीसाठी नमुना घेण्यात आला ंहोता. नंतर तिची तब्येत बिघडल्यानंतर तासाभराच्या अंतरात याठिकाणी मृत्यु झाला होता. नंतर तिच्यावर नाशिक शहरात नातेवाईकांनी अंतीमसंस्कार केले. मंगळवारी (दि.5) तिचा अहवाल आल्यानंतर चौकशीत हा सर्व खुलासा झाला आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या