गाळेधारकांना औरंगाबाद हायकोर्टाचा दणका
स्थानिक बातम्या

गाळेधारकांना औरंगाबाद हायकोर्टाचा दणका

Balvant Gaikwad

महात्मा फुले, सेंट्रल फुले मधील 40 गाळेधारकांना प्रत्येकी 10 लाख रुपये भरण्याचे आदेश औरंगाबाद हायकोर्टाने दिले. ज्या गाळेधारकांनी आपल्याकडील थकबाकी भरली नसल्याने अशा गाळेधारकांचे गाळे हे सील करण्यात आले होते.

या कारवाईनंतर हे गाळेधारक हायकोर्टात गेले होते.  मात्र औरंगाबाद कोर्टाने या गाळेधारकांविराधातच निकाल दिल्याने या गाळेधारकांना चांगलाच दणका मिळाला आहे.

यामुळे 40 गाळेधारकांकडून आता 4 जानेवारीपयर्र्त पुन्हा प्रत्येकी 10 लाखाप्रमाणे 4 कोटी रुपये पुन्हा जमा होणार आहेत. तरच त्यांचे गाळे 6 जानेवारीपासून उघडले जातील, अन्यथा नाही.

या निकालामुळे गाळेधारकांची चांगलीच पंचाईत झाली आहे. या अगोदरही 63 गाळेधारकांनी औरंगाबाद हायकोर्टाचा दरवाजा ठोठावला होता. त्यांनाही प्रत्येकी 10 लाखाचा दंड ठोठावण्यात आला होता.

त्यांचेकडूनही 10लाखा प्रमाणे 6 कोटी 30 लाख रुपये या अगोदरच जमा झाले होते. त्यात आता पुन्हा 4 कोटी रुपये जमा होणार आहेत. ज्या वेळी मनपाकडून गाळेधारकांना पैसे भरा, थकबाकी भरा म्हणून सांगण्यात येत होते.

त्यावेळी गाळेधारकांनी दुर्लक्ष केले. मनपातर्फे लाउडस्पिकरद्वारहे थकबाकी भरण्याचे आवाहन करण्यात येत होते. मात्र त्याकडेही गाळेधारकांनी साफ दुर्लक्ष केले.

अखेर कोर्टाच्या दणक्याने गाळेधारक बरोबर थकबाकी भरतात, दंडही भरतात असेही मनपा गोटात बोलले जात आहे.  गाळेधारकातर्फे अ‍ॅड. विक्रम पाटील तर मनपातर्फे अ‍ॅड. तपन थत्ते यांनी काम पाहिले.

Deshdoot
www.deshdoot.com