मालेगाव–कळवण रस्त्यावर झालेल्या अपघातातील मृतांच्या प्रशासना मार्फत मदत

jalgaon-digital
2 Min Read

नाशिक :

देवळा तालुक्यात मालेगाव–कळवण रस्त्यावर (धोबी घाटाजवळ) २८ जानेवारी २०२० रोजी दुपारी ३.३० वाजता राज्य परिवहन महामंडळाच्या एस. टी. बस. क्रमांक MH 06 S 8428 (धुळे–कळवण) व अँपे रिक्षा यांचेत अपघात होवून दोन्ही वाहने रस्त्यालगतच्या विहिरीत पडून भीषण अपघात झाला होता.

सदर अपघातात बस मधील एस. टी. बस क्रमांक MH 06 S 8428 १७ प्रवासी व रिक्षा मधील नऊ असे एकूण २६ प्रवासी मृत्यूमुखी पडले होते. एस. टी. मधील नऊ प्रवासी गंभीर जखमी झाले होते, तर २४ प्रवासी किरकोळ जखमी झाले होते.

या अपघातात एस. टी. मधील १२ मृत झालेल्या व्यक्तींना राज्य परीवहन मंडळामार्फत प्रत्येकी १० लाख रुपये मदत देण्यात आलेली आहे. उर्वरित ५ मयतांच्या वारसांना काही तांत्रिक अडचणी दूर करून अदा करण्यात करण्याची कार्यवाही सुरू आहे. सदर रक्कम धनादेशाद्वारे मयत व्यक्तीच्या वारसांना अदा करण्यात आले आहे. या बाबतचा अहवाल परिवहन मंडळाने जिल्हा प्रशासन यांचेकडे सादर केला आहे.

तसेच पंतप्रधान सहाय्यता निधीतून मयत व्यक्तींना प्रत्येकी २ लाख रुपये सहाय्य देण्याबाबतची कार्यवाही जिल्हा आपत्ती व्यवस्थापन विभागामार्फत करण्यात आलेले असून लवकरच निधी महाराष्ट्र शासनास प्राप्त होईल व मयतांच्या वारसांना मदत वितरीत करण्यात येईल, असे जिल्हाधिकारी यांनी सांगितले. तसेच पंतप्रधान सहाय्यता निधीतून रूपये ५० हजार गंभीर स्वरूपाच्या जखमी रुग्णांना देण्यात येणार आहे.

रिक्षा मधील नऊ मयत व्यक्तींना मदत देण्याकामी पाठपुरावा करण्यात आला असून त्यानुसार प्रत्येकी रूपये २ लाख महाराष्ट्र राज्य परिवहन मंडळा मार्फत देण्याबाबतचा प्रस्ताव शासनस्तरावर मंजुरी करिता देण्यात आला आहे. लवकरच यावर कार्यवाही होवून मयताच्या वारसांना मदत देण्यात येईल, असे जिल्हा प्रशासनामार्फत सांगण्यात आले आहे.

Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *