Wednesday, April 24, 2024
Homeनाशिक‘अशोका’चे शुक्ल यांना अटल आजीवन गौरव पुरस्कार

‘अशोका’चे शुक्ल यांना अटल आजीवन गौरव पुरस्कार

नाशिक । प्रतिनिधी

अशोका ग्रुप ऑफ स्कूलचे सहसचिव श्रीकांत शुक्ल यांना शैक्षणिक क्षेत्रात दिलेल्या योगदानाबद्दल अटल आजीवन गौरव पुरस्कार प्रदान करण्यात आला.

- Advertisement -

दिल्लीत अटल भारत क्रीडा व सांस्कृतिक संघटना, भारत आणि नेहरू युवा केंद्र संघटना यांच्या संयुक्त विद्यमाने इस्कॉन सभागृहात अटल पुरस्कार सोहळा नुकताच आयोजित करण्यात आला.

कला, क्रीडा, साहित्य, समाज सेवा, अपंग लोक, शासकीय सेवेशी संबंधित 70 व्यक्तींना त्यांच्याद्वारे केलेले उत्कृष्ट योगदानाबद्दल हा सन्मान करण्यात येतो. प्रमुख पाहुणे म्हणून केंद्रिय आरोग्य मंत्री श्रीपाद नाईक, अध्यक्ष दीपंकर बॅनर्जी उपस्थित होते. यावेळी संजय नगरकर, हाँगकाँग, माजी राज्यमंत्री अनुपमा जयस्वाल यांची प्रमुख उपस्थिती होती.

आयोजक तथा अटल पुरस्कार संस्थापक अध्यक्ष अटल पुरस्कार दिलीपचंद यादव यावेळी बोलताना म्हणाले, यदाचा पुरस्कार 2011 पासूनचा चौथा राष्ट्रीय पुरस्कार असून माजी पंतप्रधान अटलजी यांच्या नावे अटल पुरस्कार दिला जातो.

अशोका ग्रुप ऑफ स्कूलशी गेली 30 वर्षाहून अधिक काळ सह्रदय संबंध प्रस्थापित करणारे शुक्ल संस्थेच्या बांधकामापासून संस्थेशी जुळले गेले असून मार्गदर्शन करणे, प्रत्येक कार्यात पाठिंबा देऊन त्यासंबंधी योग्य ती पाऊले उचलणे, त्यांची अंमबलबजावणी करणे, यासाठी ते अविरत प्रयत्नशील असतात.

पेशाने सिव्हील इंजिनिअर असलेल्या शुक्ल यांनी पुणे येथून एमबीए पदवी प्राप्त केली. तेथूनच त्यांनी कायदेविषयक पदवी देखील प्राप्त केली. त्यांच्या यशाबद्दल संस्थेचे अध्यक्ष अशोक कटारिया सर्व विश्वस्त सेवक वर्गाने त्यांचे अभिनंदन केले.

- Advertisment -

ताज्या बातम्या