Wednesday, April 24, 2024
Homeक्रीडानाशिक : अशोका युनिव्हर्सलच्या देबजितचा अचूक ‘नेम’; भारतीय संघात निवड

नाशिक : अशोका युनिव्हर्सलच्या देबजितचा अचूक ‘नेम’; भारतीय संघात निवड

नाशिक । प्रतिनिधी

देबजित रॉय या खेळाडूची भारताच्या शुटींग टीममध्ये निवड झाली. देबजित अशोका ग्रुप ऑफ स्कूलचा विद्यार्थी आहे. शाळेत शिक्षण घेत असताना त्याची शुटिंगची आवड लक्षात घेऊन शाळा प्रशासन तसेच प्रशिक्षक अभय कांबळे यांनी त्याला प्रोत्साहन देत शुटींमध्ये आणले.

- Advertisement -

2015 मध्ये देबजितने पहिल्या जिल्हापातळीवरील स्पर्धेत ’एअर रायफल’ या गटात कांस्य पदक पटकाविले. यानंतर 2016 साली झालेल्या स्पर्धेत त्याला सुवर्णपदक मिळाले. यानंतर कांस्य, रजत पदक मिळवत उल्लेखनिय कामगिरीच्या जोरावर पुणे झालेल्या 60 व्या राष्ट्रीय पातळीवरील स्पर्धेत त्याची निवड झाली.

यानंतर 61 व्या राष्ट्रीय पातळीवर शुटिंग’ स्पर्धेत त्याने केरळ येथे झालेल्या सामन्यातही निवडुन येत भारतीय संघात प्रवेश केला. नवी दिल्ली येथे झालेल्या ’खेलो इंडिया खेलो’ यानंतर कोल्हापूर, दिल्ली, मुंबई, केरळ येथे पार पडलेल्या अनेकविध स्पर्धातुन स्वतःला सिद्ध करत देबजीतने सुवर्णपदक पटकाविले.

भारतीय पातळीवर झालेल्या 2019 च्या चाचणी स्पर्धेतुन देबजीतने 621.6 इतके गुण मिळवित 6 व्या क्रमांकावर स्थान पटकाविले आणि यंदा तर त्याची निवड भारतीय संघात झाली असुन हे देबजीतच्या निरंतर कष्टाचे, प्रामाणिकपणाचे तसेच चिकाटीचे फळ आहे.

प्रशिक्षक अभय कांबळे

- Advertisment -

ताज्या बातम्या