Tuesday, April 23, 2024
Homeजळगाव27 दिवसांत 8 शोरुम फोडणारी अट्टल टोळी गजाआड

27 दिवसांत 8 शोरुम फोडणारी अट्टल टोळी गजाआड

जळगाव 

गेल्या 27 दिवसात जिल्ह्यातील विविध ठिकाणचे 8 शो रुम फोडून लाखो रुपयांचा मुद्देमाल व रोकड लंपास करणार्‍या अट्टल टोळीचा रविवारी  पर्दाफाश झाला.

- Advertisement -

या टोळीतील पाच जणांना स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने अटक केली आहे. यात दोघा अल्पवयीन संशयितांचा समावेश आहे. त्यांनी आठ गुन्ह्यांची कबुली दिली. दरम्यान या टोळीने रविवारी एमआयडीसी भागातील पंकजऑटो हे शोरूम फोडून रोकड लंपास केल्याचे पुढे आले होते.

गेल्या काही दिवसांपासून जिल्हयात मोठी शोरूम फोडण्याचे सत्र सुरू होते. दर दोन तीन दिवसाआड मोठमोठी शोरूम फोडण्याचे प्रकार पुढे येत होते. या प्रकरणी पोलीस आरोपींच्या शोधात होते.

पोलिसांच्या गुप्त माहितीनुसार सोनू नागुलाल मोहिते (वय 21, रा. वापी, गुजरात, ह.मु. विचवा, ता. बोदवड), राहुल कमल मोहिते (वय 20, रा. वापी, गुजरात, ह.मु. बाळगंगा भोलात कॉलनी, इंदूर) आणि बाळू श्यामलाल चव्हाण (वय 25, रा. कुर्‍हे पानाचे, ता. भुसावळ), तसेच दोन अल्पवयीन मुलांना अटक करण्यात आली आहे.

त्यांनी केलेल्या गुन्ह्याची कबुली दिली आहे. यातील सोनू मोहिते आणि राहुल मोहिते हे गुजरात व मध्यप्रदेश राज्यातील  सराईत गुन्हेगारी आहेत. त्याच्या ताब्यातील सोन्या, चांदीचे दागिने व पल्सर मोटारसायकल आणि गुन्ह्यात वापरण्यात आलेल्या दोन टॉमी, स्क्रू ड्रायव्हर व इतर साहित्य जप्त करण्यात आले आहे.

यांनी केली कारवाई

पोलीस निरीक्षक बापू रोहम यांनी कारवाईचे आदेश दिले.  सहाय्यक फौजदार अशोक महाजन, हेड कॉन्स्टेबल रवींद्र पाटील,विजय पाटील, नरेंद्र वारुळे, सुधाकर अंबोरे, अनिल जाधव, दादाभाऊ पाटील, दीपक पाटील, आशरफ शेख, कमलाकर बागुल, शरीफ काझी, वैशाली सोनवणे, प्रमोद लाडवंजारी, गफूर तडवी, वाहन चालक दर्शन टाकणे, अशोक पाटील आदींच्या पथकाने कारवाई केली.

पंकज ऑटो शो रुमचे पार्टनर अशोक प्रभाकर चौधरी (वय 73, रा. श्रीराम भवन, बी 27, एमआयडीसी) यांचे ए 7 को.ऑ. जुन्या औद्योगिक वसाहतमध्ये शो रुम आहे. यात टीव्हीएस कंपनीच्या मोटारसायकलींची विक्री व दुरुस्ती होते.

या शो रुमचे कॅशियर प्रकाश सुरेश पाटील आहेत. त्यांच्यासह इतर कर्मचारी अन्य कामास आहेत. कॅशियर प्रकाश पाटील यांनी 16 डिसेंबर रोजी सायंकाळी 7 वाजता शो रुम बंद करुन ते नेहमी प्रमाणे घरी निघून गेले. घरी जाण्यापूर्वी कॅशियर प्रकाश पाटील यांनी कॅश काउंटरला नऊ हजार रुपये कुलूप लावून ठेवले होते.

या शो रुममध्ये रात्रपाळीस म्हणून प्रकाश पाटील काम करीत होते. दरम्यान गेल्या 27 दिवसांत जिल्ह्यात घडलेल्या शो रुम फोडीच्या घटनांमध्ये आरोपींकडून गुन्हा करतांना वापरण्यात आलेली पध्दत एकसारखीच असल्यामुळे संपुर्ण जिल्ह्यात एकाच टोळीकडून हे गुन्हे केले जात असल्याचा अंदाज पोलिसांचा होता.

- Advertisment -

ताज्या बातम्या