फिल्ड मार्शल के.एम करीआप्पा
फिल्ड मार्शल के.एम करीआप्पा
स्थानिक बातम्या

#ArmyDay: जाणून घ्या १५ जानेवारी हा दिवस ‘सैन्य दिन’ म्हणून का साजरा केला जातो?

Gaurav Pardeshi

Gaurav Pardeshi

सातपूर । प्रतिनिधी

भारतीय लष्कराचे पहिले कमांडर-इन-चीफ बनलेल्या कोडनडेरा मडप्पा करियप्पा (के. एम. करिअप्पा) यांनी ब्रिटिश राजवटीत भारतीय सैन्याचा अखेरचा ब्रिटिश सर्वोच्च कमांडर जनरल रॉय फ्रान्सिस बुचर याच्याकडून हा अधिकार घेतला. कॅरियप्पा हे देशातील पहिले कमांडर-इन-चीफ झाले होते. 15 जानेवारी 1949 रोजी त्यांनी हा पदभार घेतला होता म्हणून हा दिवस ‘आर्मी डे’ म्हणून साजरा केला जातो.

यापूर्वी 1947 च्या भारत-पाक युद्धात के. एम. करिअप्पा यांनी पश्चिम सीमेवर भारतीय सैन्याचे नेतृत्तव करीत चोख कामगिरी बजावली होती. या आर्मी डेच्या निमित्त निवृत्त आर्मी अधिकार्‍यांनी व्यक्त केलेल्या भावना..

जगातील सर्वोत्तम प्रशिक्षण पद्धती भारतात राबविली जाते. अतिशय तौलनिक व नियमांवर आधारीत हे प्रशिक्षण अद्वितीय आहे. आज आर्मीचे प्रशिक्षण कालानुरुप अद्ययावत व आधुनिक तंत्रज्ञानाने सज्ज होत आहे. यातून मिळणारे रिझल्ट सकारात्मक दिसून येत आहेत. मागील वर्षी आर्मीने बालाकोट सिमेवर अत्यूच्च कामगिरी केली. भारतीय सैन्यदलात अंतर्गत मोठ्या प्रमाणात बदल केले जात आहेत. नवी नेमणूक नुकतीच झालेली आहे. नवीन प्रमुख याबाबत प्रामुख्याने काम करतील.

– लेफ्टनंट कर्नल सायरस पिठावाला

सैन्यदलामुळे आयुष्याला दिशा मिळाली. माझ्याकट माझे कुटूंब सुजाण नागरिक बनवण्याचे मोठे काम आर्मीमुळे झाले आहे. आज समाजात वावरताना कोणीच आपल्या कर्तव्यांची नोंद घेत नाही. प्रत्येकाला फक्त हक्क माहित आहेत. मात्र जबाबदार्‍यांची जाणीव ठेवली जात नाही. आार्मीत ‘अकांऊंटॅबीली’ असते. आजही कॅम्पसमध्ये प्रत्येक झाडापुढे प्रत्येकाचे नाव लिहून त्यांची जबाबदारी निश्चित करण्यात आलेली आहे. त्यांनी त्या झाडाची निगा राखणे बंधनकारक आहे.

माझ्या कार्यकाळात सियाचिन सारख्या भागातून दोनवेळा कार्य पूर्ण केले. जगातील सैन्यांना हेवा वाटावा असे हे प्रशिक्षण राहते. समुद्र सपाटीपासून 18 ते 22 हजार फूट उंचीवर राहुन सैन्यांशी युद्ध करणे हे आव्हानात्मक असते. विपरित परिस्थितीत यद्ध कसे करतात याचे प्रशिक्षण अनुभव जगातील कोणत्याच देशाच्या सैन्यांना मिळू शकत नाही. अमेरिकेत 12 हजार फुटाच्या मर्यादा आहेत.

-कर्नल खासगीवाले

सिमेवर सतत अशांत वातावरण आहे. अतिरेकी येतात गोळीबार करतात भारतीय सैन्य त्यांना चोख प्रत्युत्तर देते. आपणही तेवढेच आक्रमक आहोत. गवत खाऊ पण बॉम्ब बनवू ही भावना जोपासणार्‍या शत्रूलाही धूळ चारण्याची क्षमता आपल्या सैन्यांमध्ये आहे. काश्मिरमध्ये आर्मी अतिरेकी कारवायांना आळा गालत आहे. सिमेवरही अतिरेक्यांना रोखण्यात यश आले आहे. त्यामुळे काश्मिर शांत होत आहे. स्वातंत्र्यानंतर आर्मी व ब्यूरोक्रॉसी यांच्यात दुरी ठेवण्यात ओली होती. मात्र, आता नव्या संकल्पना राबविल्या जात आहेत. त्यामुळे सिंगल पॉईट कॉन्टॅक्ट निर्माण करण्यात आला आहे. निर्णयाच्या प्रक्रियेत त्यामुळे सहभाग मिळू लागल्याने खर्‍या अर्थाने बदलाचे चित्र दिसून येत आहे.

-ब्रिगेडीअर जगदिशचंद्र बागूल

Deshdoot
www.deshdoot.com