वाहतूक पोलिसांच्या मदतीने शालीमार परिसरातील अतिक्रमण हटवले
स्थानिक बातम्या

वाहतूक पोलिसांच्या मदतीने शालीमार परिसरातील अतिक्रमण हटवले

Dinesh Sonawane

Dinesh Sonawane

नाशिक | प्रतिनिधी 

वर्दळीचा परिसर असलेल्या शालीमार परिसर किरकोळ व्यावसायिकांच्या गर्दीने प्रचंड विद्रूप झाला होता. तसेच वाहनधारकांनादेखील या रस्त्यावरून मार्ग काढणे जिकरीचे झाले होते. अखेर आज नाशिक शहर पोलिसांच्या भद्रकाली बीट मार्शल यांच्यसह वाहतूक शाखेच्या कर्मचाऱ्यांच्या मदतीने आज या परिसरातील अतिक्रमण हटविण्यात आले.

वाहतूक पोलिसांनी केलेल्या आवाहनास येथील अतिक्रमणधारकांना प्रतिसाद देत स्वतःहून हे अतिक्रमण काढून घेतले तर अनेकांना समज देऊन अतिक्रमण काढून घेण्यात आले.

येथील दुकानाबाहेरील लागलेले स्टॉल, नेपाळी कॉर्नर रोड वरील हॉकर्स स्टॉल काढून घेतल्यामुळे येथील दुकानदारांनी समाधान व्यक्त केले.

Deshdoot
www.deshdoot.com