पंचवटीत नीलगिरी बागेलगत बेकायदा 45 झोपड्या हटवल्या
स्थानिक बातम्या

पंचवटीत नीलगिरी बागेलगत बेकायदा 45 झोपड्या हटवल्या

Dinesh Sonawane

Dinesh Sonawane

नाशिक । प्रतिनिधी

नाशिक महानगरपालिका क्षेत्रातील पंचवटी विभागातील औरंगाबाद रोड भागात असलेल्या नीलगिरी बाग येथील लगत महापालिकेच्या ट्रांझीट कॅम्पजवळ असलेल्या 45 अनधिकृत झोपड्या आज अतिक्रमण निर्मूलन पथकाने पोलीस बंदोबस्तात हटवल्या.

नीलगिरी बागेजवळ असलेल्या स. नं. 271 व 272 मध्ये काही दिवसांपासून अज्ञात नागरिकांनी बेकायदेशीरपणे घरे व झोपड्या उभारलेल्या होत्या.

यासंदर्भातील तक्रारीनंतर महापालिका प्रशासनाने संबंधीत नागरिकांना ही घरे व झोपड्या हटविणेबाबत सूचना करण्यात आल्या असताना त्यांनी हे अतिक्रमण काढून घेतले नाही.

यामुळे आज अतिक्रमण निर्मूलन पथकाने पोलीस बंदोबस्तात जेसीबीच्या साहय्याने याठिकाणी बांधण्यात आलेली बेकायदा घरे व झोपड्या तोडण्यात आल्या. याठिकाणी पथकाने पत्र व इतर वस्तू जप्त करण्याचे कामही केले. यावेळी कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून पोलीस बंदोबस्त ठेवला होता.

ही कारवाई करण्यासाठी अतिक्रमण विभागाचे 3 पथके, पंचवटी विभागीय अधिकारी, स्लम विभागाचे संबंधीत अधिकारी व आडगाव पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक पाटील व त्यांचे पथक, अतिक्रमण निर्मूलन पोलीस बंदोबस्त सहभागी झाले होते.

Deshdoot
www.deshdoot.com