जळगाव : जिल्ह्यात आढळले आणखी करोना बाधित ८९ रुग्ण
स्थानिक बातम्या

जळगाव : जिल्ह्यात आढळले आणखी करोना बाधित ८९ रुग्ण

Balvant Gaikwad

Balvant Gaikwad

एकूण रुग्ण संख्या ११०९ ; आतापर्यंत १२२ रुग्ण दगावले

जिल्ह्यात रविवारी पुन्हा कोरोना पॉझिटिव्ह 89 रुग्ण आढळले आहेत. त्यामुळे जिल्ह्यात आतापर्यंत कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या 1109 झाली आहे, अशी माहिती जिल्हा प्रशासनाच्या वतीने देण्यात आली आहे.

पॉझिटिव्ह आढळलेल्या रुग्णांमध्ये जळगाव शहरातील 13, भुसावळमधील 18, अमळनेरातील 16, चोपड्यातील 3, भडगाव 4, धरणगावातील 2, यावलमधील 9, एरंडोल येथील 4, जामनेरमधील 3, रावेर येथील 9, पारोळा 2, चाळीसगावातील 3, मुक्ताईनगर 1, बोदवडमधील 1, परजिल्ह्यातील एका रुग्णाचा समावेश आहे.

पॉझिटिव्ह रुग्णांचा मृत्यू

जळगाव शहरातील 48 वर्षीय पुरुषास 1 जून रोजी सकाळी 11.30 वाजता शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. या कोरोना पॉझिटिव्ह रुग्णाचा मृत्यू 7 रोजी पहाटे 1.10 वाजता झाला.

अमळनेर तालुक्यातील एका गावामधील एका 60 वर्षीय वृद्धास 2 रोजी सकाळी 11.30 वाजता शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्या पॉझिटिव्ह रुग्णाचा मृत्यू 7 रोजी पहाटे 2.20 वाजता झाला.

जळगाव तालुक्यातील 75 वर्षीय वृद्धास 31 रोजी शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या रुग्णालयात दाखल केले होते. या पॉझिटिव्ह रुग्णाचा मृत्यू 6 रोजी रात्री 12.40 वाजता निधन झाला. अमळनेर तालुक्यातील एका 60 वर्षीय वृद्धास 1 रोजी दुपारी 1.35 वाजता शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. या पॉझिटिव्ह रुग्णाचा मृत्यू 7 रोजी सकाळी 8.55 वाजता झाला.

तसेच पारोळा तालुक्यातील एका 60 वर्षीय वृद्धास 3 रोजी शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या रुग्णालयात दाखल केले होते. या पॉझिटिव्ह रुग्णाचा मृत्यू 6 रोजी दुपारी 1 वाजता झाला आहे.

जिल्ह्यात आतापर्यंत 122 रुग्णांचा मृत्यू झालेला आहे. सद्यस्थितीत जिल्ह्यात 530 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहे. तर 35 रुग्ण अत्यवस्थ आहेत.

Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com