धक्कादायक : धुळ्यात आणखी 8 रूग्ण करोना बाधीत
स्थानिक बातम्या

धक्कादायक : धुळ्यात आणखी 8 रूग्ण करोना बाधीत

Balvant Gaikwad

Balvant Gaikwad

जिल्ह्यात रूग्ण संख्या 61; सहा रूग्णांची प्रकृती गंभीर

प्रलंबीत 49 नमुन्यांचा अहवाल सायंकाळी प्राप्त झाला. यात 8 जणांचे अहवाल कोरोना पॉझिटीव्ह आढळून आले असून विशेष म्हणजे हे सर्व रूग्ण धुळे शहरातील कन्टेमेंट क्षेत्रातील रहिवासी आहेत. या बाधितांमध्ये एका पोलिस कर्मचार्‍याही समावेश आहे. यामुळे जिल्ह्याची रूग्ण संख्या 61 झाली आहे. तर हिरे वैद्यकीय महाविद्यालयातील कोरोना कक्षात दाखल 6 रूग्णांची प्रकृती गंभीर असल्याची माहिती प्रशासनाने दिली आहे.

गेल्या 48 तासात शहरातसह जिल्ह्यात कोरोनाचा एकही रूग्ण आढळून आलेला नाही, अशी दुपारपर्यंतची परिस्थिती होती. आज दिवसभरात 140 नमुने घेण्यात आले. यापैकी 49 अहवाल सायंकाळी प्राप्त झाले. यातून 8 बाधित असल्याची धक्कादायक माहिती समोर आली.

जिल्ह्यात आतापर्यंत कोरोना बाधित असणार्‍या 6 जणांचा मृत्यू झाला असून 18 रूग्ण बरे होवून घरी परतले आहेत. जिल्ह्यात कोरोचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी महापालिका व जिल्हा प्रशासन प्रयत्नशील आहे.

जिल्हाधिकारी संजय यादव यांच्या आदेशानुसार प्रतिबंधीत क्षेत्रातील टाळेबंदी कायम ठेवली आहे. महापालिका हद्दीत 14 मे पर्यंत संपुर्ण लॉकडाऊन करण्यात आले आहे. शहरासह देवपूर भागातही कोरोनाचा शिरकाव झाल्याने नागरिकांमध्ये सतर्कता पाळण्यात येत आहे.

Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com