धुळे : जिल्ह्यात आणखी ६ करोना पॉझिटिव्ह
स्थानिक बातम्या

धुळे : जिल्ह्यात आणखी ६ करोना पॉझिटिव्ह

Balvant Gaikwad

धुळे शहर 2, शिरपूर 3 व धमणारमधील एकाचा समावेश; बाधित संख्या 115, बळी 15

जिल्ह्यात कोरोनाचा कहर सुरूच असून आज पुन्हा 6 रुग्णांचे अहवाल कोरोना पॉझिटिव्ह आले आहेत. त्यामुळे बाधितांची संख्या 115 झाली आहे. दरम्यान जिल्ह्यात आतापर्यंत एकुण 15 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला असून 57 जणांनी कोरोनावर मात केली आहे.

आज आढळून आलेल्या सहा जणांमध्ये धुळे शहर 2 त्यात गरिब नवाज नगर परिसरातील 60 वर्षीय पुरूष व मुस्लिम नगर परिसरातील 62 वर्षीय पुरूषाचा समावेश आहे. शिरपूरातील तीन जणांमध्ये अंबिका नगर परिसरातील 50 वर्षीय मृत महिला, खालचे गाव मंदिर परिसरातील दोन पुरूष पॉझिटिव्ह आहेत. तसेच धमणार (ता. साक्री) मधील एका पुरूषाचा समावेश आहे.

दरम्यान वाढत्या रूग्ण संख्येमुळे नागरिकांमध्ये भितीचे वातावरण निर्माण झाले आहे. प्रशासन आता हे रूग्ण आणखी कोणात्या संपर्कात आले, याचा शोध घेत असून त्यांची तपासणी करण्यात येत आहे. तसेच रुग्णांचे रहिवास क्षेत्र सील करण्याचे काम सुरू करण्यात आले आहे.

नागरिकांनी कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी खबरदारी बाळगावी. शारीरिक अंतर ठेवावे. नागरिकांनी घरातच सुरक्षित राहावे. अनावश्यक गर्दी टाळावी, असे आवाहन जिल्हाप्रशासनाकडून करण्यात आले आहे.

बल्हाणेतील चौघांचे रिपार्ट निगेटिव्ह

साक्री तालुक्यातील येथील कोरोना बाधित कुटुंबातील चार जणांचे स्वॅब तपासणीसाठी पाठविण्यात आले होते. आज त्याचे रिपार्ट निगेटिव्ह आले आहेत. तर एकाचा रिपार्ट मिळणे बाकी आहे.

Deshdoot
www.deshdoot.com