Thursday, April 25, 2024
HomeUncategorizedजळगाव : जिल्ह्यात आढळले आणखी कोरोना बाधित ५९ रुग्ण

जळगाव : जिल्ह्यात आढळले आणखी कोरोना बाधित ५९ रुग्ण

 एकूण रुग्ण संख्या ७३८

जळगाव  – 

जिल्हा प्रशासनास शनिवारी सायंकाळी 7.30 ते रविवारी दुपारी 12 वाजेदरम्यान दोन टप्प्यात एकूण 59 रुग्णांचे अहवाल कोरोना पॉझिटिव्ह प्राप्त झाले आहेत. तर नऊ रुग्णांचे फेरतपासणी अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत.

- Advertisement -

शनिवारी सायंकाळी 7.30 वाजता प्रशासनास 47 अहवाल प्राप्त झाले. यात 24 अहवाल निगेटिव्ह आहेत. 22 रुग्णांचे अहवाल पॉझिटिव्ह आहेत.

तर एका रुग्णांचा फेरतपासणी अहवालही पॉझिटिव्ह आला आहे. पॉझिटिव्ह आढळलेल्या रुग्णांमध्ये जळगाव शहर 12, यावल तीन, जळगाव (ग्रामीण) एक, अमळनेर दोन, एरंडोल दोन, भुसावळ एक, सावदा (रावेर) एक असे 22 रुग्ण आहेत.

दुसर्‍या टप्प्यात 37 रुग्ण

जिल्हा प्रशासनास अहवालाचा दुसरा टप्पा रविवारी दुपारी 12 वाजेच्या सुमारास प्राप्त झाला. यात 69 अहवाल निगेटिव्ह आले. 37 रुग्णांचे अहवाल पॉझिटिव्ह आणि आठ रुग्णांचे फेरतपासणी अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत.

पॉझिटिव्ह आढळलेल्यांमध्ये जळगाव शहर 12, जळगाव ग्रामीण दोन, भुसावळ सात, यावल तीन, रावेर एक, धरणगाव तीन, अमळनेर पाच, पाचोरा एक, चोपडा एक, जामनेर दोन रुग्णांचा समावेश आहे.

जिल्ह्यात आतापर्यंत पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या 738 झाली आहे. 24 तासात चार रुग्णांचा मृत्यू झाला. जिल्ह्यात आतापर्यंत 81 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तर आतापर्यंत 258 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत.

- Advertisment -

ताज्या बातम्या