Thursday, April 25, 2024
HomeUncategorizedजळगाव : जिल्ह्यात आढळले आणखी करोना बाधित ३१ रुग्ण

जळगाव : जिल्ह्यात आढळले आणखी करोना बाधित ३१ रुग्ण

एकूण रुग्ण संख्या ५२३ ; ग्रामीण भागातही वाढतेय करोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या

जळगाव – 

जिल्ह्यात मंगळवारी करोना बाधित 30 रुग्ण आढळले. जिल्ह्यातील करोना बाधित रुग्णांची संख्या आता 522 झाली आहे, अशी माहिती जिल्हा प्रशासनाच्या वतीने देण्यात आली आहे.

- Advertisement -

अहवालाचा पहिला टप्पा मंगळवारी सकाळी प्राप्त झाला. यात रावेर, भडगाव, धरणगाव येथे स्वॅब घेतलेल्या 64 कोरोना संशयित व्यक्तींचे नमुना तपासणी अहवाल सकाळी प्राप्त झाले.

यातील 57 व्यक्तींचे अहवाल निगेटिव्ह आले आहेत. तर सात रुग्णांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. पॉझिटिव्ह आढळलेले सातही रुग्ण भडगाव येथील आहेत.

दुसर्‍या टप्प्यात दोन रुग्ण

अहवालांचा दुसरा टप्पा दुपारी जाहीर झाला. भडगाव, पारोळा, धरणगाव येथील 47 अहवाल प्राप्त झाले. यातील 45 अहवाल निगेटिव्ह, तर 2 अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. पॉझिटिव्ह आढळलेल्या रुग्णांमध्ये वडजी, भडगाव येथील एक, तर धरणगावच्या एका रुग्णाचाचा समावेश आहे.

तिसर्‍या टप्प्यात निगेटिव्ह

अहवालांचा तिसरा टप्पाही दुपारी प्राप्त झाला. एरंडोल येथे स्वॅब घेतलेल्या 72 संशयित करोना व्यक्तींचे तपासणी अहवाल प्राप्त झाले. सर्व अहवाल निगेटिव्ह आले आहेत.

चौथ्या टप्प्यात 7 रुग्ण

चौथ्या टप्प्यात दुपारी भडगाव, धरणगाव, एरंडोल, अमळनेर, यावल, सावदा, भुसावळ येथील 37 अहवाल प्राप्त झाले. 30 अहवाल निगेटिव्ह, तर सात अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. पॉझिटिव्ह आढळलेल्या रुग्णांमध्ये अमळनेर 3, भुसावळ 2, एरंडोल व सावदा येथील प्रत्येकी एका रुग्णाचा समावेश आहे.

पाचव्या टप्प्यात 14 रुग्ण

अहवालाचा पाचवा टप्पा सायंकाळी जाहीर झाला. जळगाव, भुसावळ, अमळनेर, यावल, एरंडोल, चाळीसगाव, नशिराबाद, पाचोरा, जामनेर, भडगाव या ठिकाणी स्वॅब घेतलेल्या 98 संशयित कोरोना व्यक्तींचे तपासणी अहवाल प्राप्त झाले आहे.

यातील 84 व्यक्तींचे अहवाल निगेटिव्ह आले आहेत. तर 14 रुग्णांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. पॉझिटिव्ह आढळलेल्या रुग्णांमध्ये भडगाव 7, जळगाव येथील ओंकारनगर, शिरसोली येथील तीन तर यावल, भुसावळ, जामनेर, एरंडोल येथील प्रत्येकी एका रुग्णाचा समावेश आहे.

सहाव्या टप्प्यात 1 रुग्ण

सहाव्या टप्प्यात पारोळा व एरंडोल येथील 59 अहवाल रात्री प्राप्त झाले. यातील 58 अहवाल निगेटिव्ह, तर 1 अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. पॉझिटिव्ह आढळलेला रुग्ण पारोळा येथील आहे.

तरसोद पाठोपाठ शिरसोलीतही रुग्ण

जळगाव तालुक्यातील तरसोद येथील 70 वर्षीय वृद्धाचा अहवाल मंगळवारी पॉझिटिव्ह आला आहे. याबाबत कळताच आरोग्य विभागाचे पथक तरसोदला पोहचले. तेथील आरोग्य विषयक सर्वेक्षण, तपासणी, परिसर सॅनिटराइज करणे, साफसफाई आदी कामे युद्धपातळीवर करण्यात आले. तरसोद येथील उपाययोजनांची माहिती तहसीलदार श्वेता संचेती, जिल्हा परिषदेचे जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.दिलीप पाटोळे, गटविकास अधिकारी शशिकांत सोनवणे, तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ.संजय चव्हाण आदींनी पाहणी केली. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर काळजी घेण्यासंदर्भात अधिकार्‍यांनी ग्रामस्थांना मार्गदर्शन केले. तर योग्य त्या उपाययोजना राबवण्याबाबत संबंधित कर्मचार्‍यांना सूचना देण्यात आल्या आहेत. बुधवारी सायंकाळी शिरसोलीतील तीन रुग्णांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. त्यामुळे आरोग्य यंत्रणेही शिरसोलीतही तातडीने उपाययोजना राबवल्या. या अगोदर जळगाव तालुक्यातील नशिराबाद, भोकर, विटनेर, जळगाव शहरातील वाघनगराजवळील सावखेडा शिवारामधील परिसर, डॉ.उल्हास पाटील वैद्यकीय महाविद्यालय, तरसोद आणि त्यानंतर आता शिरसोलीतही पॉझिटिव्ह रुग्ण आढळले आहेत.

- Advertisment -

ताज्या बातम्या