जळगाव : जिल्ह्यात आढळले आणखी करोना बाधित १८ रुग्ण
स्थानिक बातम्या

जळगाव : जिल्ह्यात आढळले आणखी करोना बाधित १८ रुग्ण

Balvant Gaikwad

Balvant Gaikwad

एकूण रुग्ण संख्या 468

जिल्ह्यात सोमवारी कोरोना बाधित 18 रुग्ण आढळले. जिल्ह्यातील कोरोना बाधित रुग्णांची संख्या आता 468 झाली आहे, अशी माहिती जिल्हा प्रशासनाच्या वतीने देण्यात आली आहे.

अहवालाचा पहिला टप्पा सोमवारी दुपारी आला. यात भुसावळ व भडगाव येथील स्वॅब घेतलेल्या संशयित कोरोना व्यक्तींपैकी 30 व्यक्तींचे तपासणी अहवाल प्राप्त झाले. यातील 24 व्यक्तींचे तपासणी अहवाल निगेटिव्ह आले आहेत. तर पाच रुग्णांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत.

एका व्यक्तीचा पूनर्तपासणी अहवालही पॉझिटिव्ह आला आहे. पॉझिटिव्ह आढळलेल्यांमध्ये भुसावळ शहरातील फालकनगर, गुंजाळ कॉलनी, गांधीनगर व दीपनगरातील रुग्णाचा समावेश आहे.

दुसर्‍या टप्प्यात चार रुग्ण

अहवालाचा दुसरा टप्पा सायंकाळी जाहीर झाला. भुसावळ व चोपडा येथील स्वॅब घेतलेल्या संशयित कोरोना व्यक्तींपैकी 55 व्यक्तींचे अहवाल प्राप्त झाले. यातील 50 व्यक्तींचे तपासणी अहवाल निगेटिव्ह आले आहेत. तर चार रुग्णांचे अहवाल पॉझिटिव्ह आहेत. एका व्यक्तीचा पूनर्तपासणी अहवालही पॉझिटिव्ह आला आहे. पॉझिटिव्ह आढळलेल्यांमध्ये चोपडा येथील तीन, तर भुसावळ शहरातील एका रुग्णाचा समावेश आहे.

तिसर्‍या टप्प्यात नऊ रुग्ण

जळगाव येथे स्वॅब घेतलेल्या 110 कोरोना संशयित व्यक्तींचे नमुना तपासणी अहवाल तिसर्‍या टप्प्यात रात्री प्राप्त झाले. यातील 101 तपासणी अहवाल निगेटिव्ह आले आहेत. तर नऊ रुग्णांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहे.

पॉझिटिव्ह आढळलेल्या व्यक्तींमध्ये भुसावळचे चार, यावलचे दोन, तर सावदा, एरंडोल व अमळनेरच्या प्रत्येकी एका रुग्णाचा समावेश आहे. जिल्ह्यातील आतापर्यंत 195 रुग्ण कोरोनावर मात करुन बरे झाले आहे, असेही जिल्हा प्रशासनाच्या वतीने स्पष्ट करण्यात आले आहे.

दरम्यान, जळगाव शहरासह काही ठिकाणच्या कोरोना संशयित मृतांच्या अंत्ययात्रेत नातेवाईक, परिचितांची गर्दी होत आहे. त्यामुळे धोका वाढल्याची तक्रार आहे.

Deshdoot
www.deshdoot.com