मुंगसे येथील ‘त्या’ रुग्णाच्या संपर्कातील 21 जणांची तपासणी

अमळनेर तालुक्यातील 14, चोपडा येथील 7 जणांचा समावेश,
14 जण होम क्वांरटाईन, सर्व्हेक्षणासाठी चार पथके कार्यान्वित

अमळनेर  –

तालुक्यातील मुंगसे येथील 60 वर्षीय महिला कोरोना पॉझिटीव्ह आल्याने त्या महिलेच्या संपर्कातील 21 जणांना स्वॅप तपासणीसाठी जळगाव येथे सामान्य रुग्णालयात रवाना करण्यात आले आहे.यात अमळनेर तालुक्यातील 14 तर चोपडा येथील रुग्णालयातील सात जणांचा समावेश आहे.तर झामी चौकातील साळी वाडा भागातील एका 45 वर्षीय कोरोना संशयीत महिलेचा मृत्यू झाला तिचेवर आज अंत्यसंस्कार करण्यात आले .

त्यामुळे शहरासह तालुक्यात प्रचंड खळबळ उडाली आहे.दरम्यान साळी वाड्यातील मयत महिलेचा अहवाल अद्याप प्राप्त झाला नसल्याचे समजते. तसेच मुंगसे गावातील रुग्ण महिलेच्या संपर्कात आलेले 21 व्यतीरिक्त 14 जणांना गावातच होम क्वांरटाईन करण्यात आले आहे. चौकाचौकात पालिका कर्मचार्‍यांनी पोलिसांची भूमिका निभावली त्यामुळे शुकशुकाट पसरला होता रस्ते बंद होते सर्व व्यवहार बंद असल्याने शहरात शुकशुकाट दिसला .

माजी आमदार साहेबराव पाटील यांनी यासाठी घंटागाड्या मुख्य रस्त्यावर आडवी लावून वाहतूक बंद केली. होती कामाव्यतिरिक्त रस्त्यावर फिरणार्‍यांना उठाबशा घालायला लाऊन त्यांना शिक्षा केली त्यामुळे रस्त्यावर बाहेर पडणे बंद झाले. सकाळपासून घंटागाड्या तीन दिवस तालुका बंद असल्याचे जाहीर करत फिरत होत्या त्यामुळे नागरिक सतर्क झाले.

संचारबंदीच्या कठोर अंमलबजावणी मुळे लोक बाहेर निघाले नाही. 8 अधिकारी आणि 150 कर्मचारी 15 होमगार्ड रात्रीच तैनात करण्यात आले असून घरातून नागरिक बाहेर पडणार नाहीत याची खबरदारी घेतली असुन चोपडा रस्त्यावरील तापी काठालगत असलेले मूंगसेसह सावखेडा रूंधाटी दापोरी खूर्द हि चारही गावे सील करण्यात आले आहेत.

चारही गावांना हायपोक्लोराईड सोल्युशनने फवारणी करण्यात येत असून सकाळ संध्याकाळ गावात फवारणी करण्यात येत आहेत. हे तीनही गावे 3 दिवस सील करण्यात आले असुन कोणीही आत येणार नाही कोणीही बाहेर जाणार नाही. याची खबरदारी प्रशासनाने घेतली आहे.

दरम्यान चारही गावात सर्दी ताप खोकला संशयित रुग्णांचे 4 पथकांद्वारे सर्व्हे सुरू करण्यात आले असून त्यात संशयित रुग्णांची तपासणी करण्यात येणार आहे. त्यात वैद्यकीय अधिकारी आरोग्य सेवक सेविका आशा वर्कर यांचा समावेश आहे. या वृद्ध महिलेच्या संपर्क अजून कुठे कुठे झाला आहे याबाबत खात्री केली जात असून सदर महिलेच्या पतीला देखील स्वॅप तपासणी करण्यात आली आहे.

गटविकास अधिकारी संदिप वायाळ हे देखील या गावांमध्ये स्थिती काय आहे हे जाणून घेत आहेत.
चोपडा रस्त्यावरील तापी काठावरील मुंगसे गावासह आजूबाजूचे 7 किमी अंतरावरील सावखेडा रूंधाटी दापोरी खूर्द हि चारही गाव सील करण्यात आली आहेत.तर शहरातील मूख्य रस्ते सिल करून रूग्णालयाला लागून असलेले मेडीकल वगळता सर्व मेडीकल किराणा भाजीपाला सर्वच दूकाने 3 दिवस बंद ठेवण्यात आली आहेत शहरात संचारबंदीची कडक अंमलबजावणी होत आहे .

तर शहरातील साळी वाडा भागातील एका महिलेचा मृत्यू झाला आहे सदर महिलेचा अद्याप रिपोर्ट आलेला नाही मात्र कोव्हीड संशयित रुग्ण आढळल्याने शहरासह तालूक्यात आपात्कालीन परिस्थिती निर्माण झाली आहे त्यामुळे संपुर्ण अमळनेर शहर व तालुक्यात संपूर्ण संचारबंदी लागु करण्यात आली आहे अमळनेर कृषी उत्पन्न बाजार समिती दि. 20 व दि.21 एप्रिल रोजी बंद राहील, सर्व लिलाव पुर्णपणे बंद राहतील.

बाजार समिती दिनांक 22 एप्रिल पासून नियमितपणे सुरू राहील बाजार समिती या पुढे नियमित पणे सुरू राहील तरी शेतकरी बांधवांना एकाच वेळी गर्दी करू नये. नियमांचे पालन करून बाजार समिती प्रशासनास सहकार्य करावे असे आवाहन सभापती प्रफूल पाटील यांनी केले आहे तर दि 20 एप्रील पासून शासनाची कापूस खरेदी केंद्र देखील सूरू होणार होते ते तालूक्यात सूरू हेवू शकणार नाही यामूळे कापूस विक्रीस आणू नये असे आवाहन आ अनिल पाटील यांनी केले आहे शहरात वैद्यकीय सेवा व्यतीरिक्त सर्व कडकडीत बंद आहे .