कोरोना इफेक्ट : जैन तीर्थक्षेत्र असलेल्या मांगीतुंगीतील सर्व कार्यक्रम रद्द

उमराणे | वार्ताहर 

चीनमधून जगभरात शिरकाव करणाऱ्या कोरोना व्हायरसने थैमान घातले आहे. केंद्र आणि राज्य सरकारकडून सार्वजनिक ठिकाणी गर्दी न करण्याचे आवाहन करण्यात आले आहेत.

गर्दी होणारी धार्मिक स्थळे बंद करण्याचे आदेश काढण्यात आले आहेत. सर्व नियोजित कार्यक्रम, यात्रा रद्द करण्याचे आदेश देण्यात आले असताना आज बागलाण तालुक्यातील जैन तीर्थक्षेत्र असलेल्या मांगीतुंगी येथील नियोजित सर्व कार्यक्रम रद्द केल्याची माहिती आयोजकांनी देशदूतशी बोलताना दिली.

यावेळी मांगीतुंगी सिद्ध क्षेत्राचे उपेन्द्र लाड म्हणाले की, दिगंबर जैन सिध्दक्षेत्र श्री मांगीतुंगीजी येथील सर्व धार्मिक कार्यक्रम रद्द करण्यात येत आहेत.

तसेच परिस्थितीत सुधारणा होईपर्यंत व प्रशासकीय सूचना प्राप्त होईपर्यंत भाविकांनी सहकार्य करावे. मंदिरातील नित्य धार्मिक विधी, फक्त अंतर्गत मंदिर पुजारी व व्यवस्थापन समिती यांच्यामार्फत चालू राहतील.

बाह्य व्यक्ती अथवा भाविक यांना आत प्रवेश दिला जाणार नाही याची कृपया सर्वांनी नोंद घ्यावी असे आवाहन संस्थानचे अध्यक्ष सुमेरकुमार काले, महामंत्री उपेन्द्र लाड यांनी केले आहे.

आठवडे बाजारही बंद

कसमादे पंचक्रोशीतील अनेक आठवडे बाजार कोरोनाच्या पार्श्वभूमीवर बंद ठेवण्यात आले आहेत. आठवड्यातून पंचक्रोशीतील प्रत्येक मोठ्या गावात वेगवेगळ्या दिवशी आठवडे बाजार भरत असतो. याठिकाणी बाजार बंद ठेवण्यात आले आहेत. मालेगाव तालुक्यातील सौदाणे बाजार बंद ठेवण्यात आला आहे.

याबाबची माहिती सरपंच डॉ मिलिंद पवार यांनी दिली. शेतकरी व्यापारी बांधवांनी आपला माल विक्रीस आणू नये तसेच प्रादुर्भाव कमी होइपर्यंत शक्यतो घराबाहेर पडू नये ,गर्दी च्या ठिकाणी जाऊ नये असे आवाहन करण्यात आले आहे.


Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *