जळगाव : जिल्ह्यात आणखी एक करोना बाधित रुग्ण आढळला
स्थानिक बातम्या

जळगाव : जिल्ह्यात आणखी एक करोना बाधित रुग्ण आढळला

Balvant Gaikwad

जिल्ह्यातील संशयित रुग्णांपैकी १२ व्यक्तींचे तपासणी अहवाल गुरुवारी सायंकाळी प्राप्त झाला. यात कोरोना बाधीत आणखी एक रुग्ण आढळला आहे.

कोरोना बाधीत हा रुग्ण भुसावळ येथील ३८ वर्षीय महिला आहे. जिल्ह्यात आतापर्यंत कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या ३२ झाली आहे.

गुरुवारी निगेटिव्ह अहवाल प्राप्त झालेल्या ११ व्यक्तींपैकी सात व्यक्ती भुसावळच्या असून चार जण जळगावचे आहेत,  अशी माहिती शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या प्रशासनाने दिली आहे.

Deshdoot
www.deshdoot.com