धक्कादायक : एअर इंडियाच्या ५ पायलटसह दोन स्टाफ मेम्बर्सला करोनाची लागण

धक्कादायक : एअर इंडियाच्या ५ पायलटसह दोन स्टाफ मेम्बर्सला करोनाची लागण

नवी दिल्ली :  करोना व्हायरसचा उद्रेक थांबता थांबत नाहीये.  आता करोनाच्या उद्रेकात करोना विरुद्ध लढणाऱ्या करोना वॉरियर्सला देखील करोनाने ग्रासले आहे. यातच भारतीय विमान कंपनी एअर इंडियाचा पाच पायलटसचीदेखील करोना टेस्ट बाधित आढळून आली आहे. यामध्ये दोन स्टाफ मेंबर्सचाही समावेश असल्याचे समोर आले आहे.

यातील सर्व संशयितांना मुंबईमध्ये ठेवण्यात आले आहे. काल (दि. ०९) रोजी ७७ पायलट्सची चाचणी करण्यात आली होती. यानंतर पाच पायलटसला करोनाची लागण झाल्याचे समोर आले आहे. याशिवाय दोघा स्टाफ मेम्बर्सचीदेखील करोना टेस्ट बाधित आढळून आली आहे. यामुळे सर्वांचा स्थानबद्ध करण्यात आले आहे. वरील बाधित पायलटने चीनला उड्डाण केले होते. पण अद्याप चीनला जाण्याचे त्यांचा बाधा झाली आहे किंवा देशभरातील उद्रेकामुळे त्यांना लागण झाली.

वंदे भारत मिशनच्या माध्यमातून भारतातील नागरिक इतर देशांत अडकलेले आहेत त्यांना मायदेश आणण्यासाठी भारतीय एअर इंडिया कंपनी कार्यरत आहे. जे पायलट करोना बाधित आढळून आले आहेत त्यांनी २० एप्रिल रोजी  चीनकडे उड्डाण केले होते.

वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार या पायलटसनी यात्रेकरूंच्या संपर्कात न येण्यासाठी पुरेपूर प्रयत्न केले होते. तरीदेखील त्यांना करोनाने ग्रासले आहे. बाहेरील देशातील परतलेले क्र्यू मेम्बर्स आणि पायलटस यांची प्राधान्याने तपसणी केली जात आहे.

देशभरात एकूण ६२ हजार ९३९ करोना बाधित रुग्ण आढळून आले आहेत.  प्रशासनाच्या माहितीनुसार आतापर्यंत करोना व्हायरसमुळे २ हजर १०९ नागरिक दगावले आहेत. आजही देशात गेल्या २४ तासांत 3 हजार277 नवीन केसेस दाखल झाल्या आहेत. तर आतापर्यंत १२८ नागरिकांचा जीव गेला आहे. तर आतापर्यंत १९ हजार ३५८ नागरिक करोनामुक्त झाले आहेत.

Related Stories

Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com