Wednesday, April 24, 2024
Homeनगरमहापालिकेकडून नगरात सोडिअम हायपोक्लोराईडची फवारणी

महापालिकेकडून नगरात सोडिअम हायपोक्लोराईडची फवारणी

अहमदनगर (प्रतिनिधी) – राज्यात कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रशासनाकडून सर्वतोपरी प्रयत्न करण्यात येत आहेत. अनेक दिवस गम्मंत पाहणार्‍या महापालिकेला आताशी कुठे जाग आलीय. महापालिकेने आज नगर शहरात औषध फवारणीस सुरूवात केली आहे.

मुंबईसह राज्यात कोरोना व्हायरसच्या रुग्णांमध्ये दिवसागणिक वाढ होत आहे. त्यातच मंगळवारी नगर शहरात आणखी एका डॉक्टरला कोरोनाची लागण झाल्याचे समोर आले आहे. त्यामुळे अहमदनगर महापालिका खडबडून जागी झाली आहे.

- Advertisement -

नगर शहरात निर्जंतुकीकरण करण्यास सुरुवात करण्यात आली आहे. सोडिअम हायपोक्लोराईड या औषधाची फवारणी करण्यात येत आहे. नगर शहरातील कापडबाजार, मार्केट यार्ड, माळीवाडा, गाडगीळ पटांगण, दिल्लीगेट, चितळे रोड, मंगळवार बाजार, सर्जेपुरा, सावेडी उपनगर, पाईपलाईन रोड, यशोदानगर परिसरात असणार्‍या भाजी मंडई, बस स्थानक, शासकीय व खासगी रुग्णालयात, गटारी, घरे, बंगले, बसस्टँण्ड परिसरात फवारणी करण्यात येत होती.

- Advertisment -

ताज्या बातम्या