स्थानिक बातम्या

इगतपुरी गटविकास अधिकाऱ्याविरोधात उपोषण; पिंपळगाव मोरच्या ग्रामस्थांचा इशारा

Dinesh Sonawane

Dinesh Sonawane

नाशिक । प्रतिनिधी

सिन्नर विधानसभा मतदार संघात येणाऱ्या पिंपळगाव मोर येथील ग्रामस्थांनी ग्रामपंचायत कामकाजासंदर्भात दाखल केलेल्या अर्जावर कार्यवाही होत नसल्याने इगतपुरीच्या गटविकास अधिकाऱ्याविरोधात आमरण उपोषण करण्याचा इशारा दिला आहे.

ग्रामपंचायतीशी संबंधित तीन चौकशी अर्ज गटविकास अधिकाऱयांच्या स्तरावर प्रलंबित असून वारंवार मागणी करून देखील कार्यवाही केली जात असल्याचे उमेश बेंडकोळी, गोटीराम काळे यांनी म्हटले आहे. हे चौकशी अर्ज निकाली काढून संबंधितांविरोधात करावी करावी असे आदेश जिल्हा परिषद स्तरावरून देण्यात आले आहेत.

मात्र त्याकडे गटविकास अधिकारी डोळेझाक करीत असल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे. गटविकास अधिकारी ज्यांच्या विरोधात अर्ज आहे अशा व्यक्तींना पाठीशी घालत असून दाखल तक्रारींची चौकशी करून कारवाई करायला टाळाटाळ केली जात आहे. त्यामुळे न्यायाच्या प्रतीक्षेत असलेल्या ग्रामस्थांनी गटविकास अधिकाऱ्यांच्या विरोधात आमरण उपोषणास बसण्याचा इशारा दिला आहे.

तांत्रिक दृष्टया सिन्नर मतदार संघात येणाऱ्या पिंपळगाव मोर सह टाकेद जिल्हा परिषद गावांकडे पंचायत समिती प्रशासनाकडून दुर्लक्ष होत असल्याने आमदार माणिकराव कोकाटे यांनी देखील लक्ष घालण्याची मागणी ग्रामस्थांनी केली आहे. मुख्य कार्यकारी अधिकारी, इगतपुरीच्या पोलीस निरीक्षकांना या संबंधी निवेदन देण्यात आले आहे.

Deshdoot
www.deshdoot.com