Thursday, April 25, 2024
Homeजळगावदेशभरातील आंदोलनाचा केळी निर्यातीवर परिणाम : अरब राष्ट्रातील निर्यात ठप्प

देशभरातील आंदोलनाचा केळी निर्यातीवर परिणाम : अरब राष्ट्रातील निर्यात ठप्प

रावेर  –

देशभरात नागरिकत्वाच्या मुद्यावरुन रणकंदन माजलेले असतांना,या घटनेचा खान्देशातील केळी निर्यातीला फटका बसला आहे.पश्चिम बंगालमध्ये अधिक पडसाद उमटत असल्याने,निर्यातक्षम  केळी भरण्यासाठी पश्चिम बंगालचे मजूर खान्देशात येण्यासाठी अडचणी निर्माण होऊन,अरब राष्ट्रातील केळी निर्यात ठप्प झाली आहे.

- Advertisement -

गेल्या तीन-चार वर्षापासून रावेर तालुक्यातून अरब राष्ट्रातील इराक,इराण,ओमान,अफगाणिस्थान या देशात केळी निर्यात होत आहे.तांदलवाडी येथील महाजन बनाना व रावेर येथील रुची बनाना यांच्या माध्यमातून देसाई,बंधन सारखे मोठे केळी निर्यातदार रावेर तालुक्यात दाखल झाले आहे.

गत वर्षात जवळपास 500 कंटेनर बाहेरील देशात रवाना झाले आहे.यंदाही अधिक लक्ष्यांक आहे.मात्र देशात सद्यस्थितीत नागरिकत्वच्या मुद्यावरून

हिंसाचाराच्या घटना घडत आहे,यात पश्चिम बंगालमध्ये अधिक लोण पसरल्याने,स्थानिक नागरिकांवर याचे परिणाम जाणवत आहे.तालुक्यातील एक्स्पोर्ट दर्जाच्या केळीची हाताळणी,पॅॅकिंग करण्यासाठी पश्चिम बंगालमधून मजूर येतात,या पारीस्थितीत येऊ शकत नसल्याने,अरब राष्ट्रातील केळी निर्यात ठप्प झाली आहे.

बाहेरील देशात केळी निर्यातीत अडचणी आल्याने,देशांतर्गत उत्तरप्रदेश,उत्तराखंड,राज्यस्थान याभागात केळी निर्यातीवर वाढत्या थंडीमुळे मागणीत घट झाली आहे.

जम्मू-श्रीनगर भागात हिमवृष्टीमुळे लोडिंग कमी झाली आहे.यातून केळी भावावर परिणाम जाणवत आहे.8 दिवसात 100 रुपयांनी भाव घसरले आहे.प्रतिकूल परिस्थितीत रविवारी रावेरहून श्रीनगरसाठी केळीचा ट्रक रवाना होत असल्याने,शेतकर्‍यांसाठी आनंदाची बातमी आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या