गुटखा विक्रेत्याविरुध्द कारवाई

गुटखा विक्रेत्याविरुध्द कारवाई

सिन्नर । प्रतिनिधी

गावाबाहेरील देवी रोड नारायण संकुलामधील मातोश्री किराणा दुकानावर सिन्नर पोलीसांनी छापा टाकून शासनाने बंदी घातलेल्या पान मसाला व सिगारेट असा एकुण 4236 रुपयांचा मुद्देमाल जप्त करत दुकानमालकाच्या विरोधात गुन्हा दाखल केला.

पोलीस निरिक्षक साहेबराव पाटील, सहाय्यक निरिक्षक रसेडे, पोलीस हवालदार भगवान शिंदे, समाधान बोर्‍हाडे, नवनाथ चकोर हे आपल्या सहकार्‍यांसह शहारात गस्तीवर फिरत असतांना नारायण संकुलातील दुकानात अठरा वर्षाखालील मुलांना तंबाखूजन्य पदार्थांची विक्री केली जात असल्याची गुप्त माहीती मिळाली.

त्यावरुन सायकांळी 6.20 च्या दरम्यान छापा टाकला असता बंदी असलेल्या सुगंधी तंबाखूजन्य पदार्थांसह गुटख्याची विक्री सुरु असल्याचे दिसून आले. त्यात सुगंधी तंबाखू, वाह पान मसाला, रंगबाज पान मसाला, विमल पान मसाला, हिरा पान मसाला, आर.एम.डी. पान मसाला,

ओम स्पेशल पंढरपुरी तंबाखू यासह वेगवेगळ्या कंपन्यांची सिगारेट पाकीटे असा 4236 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. दुकानाचे मालक प्रकाश आनंदा कातकाडे (49) रा. आय.टी.आय. जवळ याच्या विरोधात सिगारेट आणि अन्य तंबाखू उत्पादने अधिनियम 2003 कलम 6(अ) आर.डब्ल्यू./24 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com