नाशिक : एनडीएसटीचे दोन व्यवस्थापक लाच स्वीकारताना ‘एसीबी’च्या जाळ्यात; ७ व्या वेतन आयोगाच्या फरकासाठी मागितली लाच

नाशिक : एनडीएसटीचे दोन व्यवस्थापक लाच स्वीकारताना ‘एसीबी’च्या जाळ्यात; ७ व्या वेतन आयोगाच्या फरकासाठी मागितली लाच

नाशिक | प्रतिनिधी

नाशिक जिल्हा माध्यमिक शिक्षक सोसायटीच्या शाखा व्यवस्थापकांना १९ हजार ७१५ हजार रुपयांची लाच घेताना अटक करण्यात आली आहे. शरद जाधव व जयप्रकाश कुवर अशी लाचखोरांची नावे आहेत.  नाशिकच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने दोघांना रंगेहाथ पकडून ही कारवाई केली.

अधिक माहिती अशी की, तक्रारदार शिक्षकाच्या सातव्या वेतन आयोगाच्या फरकाची रक्कम काढून द्यावी तसेच नियमित पगार काढून देण्याच्या मोबदल्यात नाशिक जिल्हा माध्यमिक शिक्षक आणि नॉन टीचिंग इम्प्लोयी को-ऑप सोसायटीच्या संचालक मंडळाला देण्यासाठी शाखा व्यवस्थापक शरद वामन जाधव व जयप्रकाश रघुनाथ कुवर या दोघांनी तक्रारदाराकडे १९ हजार ७१५ रुपयांची मागणी केली होती.

५ जून रोजी वरील दोन्ही व्यक्ती लाच मागत असल्याबाबत तक्रारदाराने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाला याबाबतची माहिती दिली.
यानंतर, या पथकाने पडताळणी करून सापळा रचला.

यादरम्यान, शाखा व्यवस्थापक शरद जाधव व जयप्रकाश कुवर याने तक्रारदाराकडून आज कार्यालयात १९ हजार ७१५ रुपयांची लाच स्वीकारताना रंगेहाथ अटक केली.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com