कृत्रिम बुद्धिमत्तेचा महामेरू ‘आरोग्य सेतू’; ब्लू टूथ’ आणि मोबाईल क्रमांकाने समजणार कोरोनाचा धोका
स्थानिक बातम्या

कृत्रिम बुद्धिमत्तेचा महामेरू ‘आरोग्य सेतू’; ब्लू टूथ’ आणि मोबाईल क्रमांकाने समजणार कोरोनाचा धोका

Dinesh Sonawane

Dinesh Sonawane

नाशिक | प्रतिनिधी

कोविड-19’शी लढा देण्याच्या प्रयत्नांचा एक भाग म्हणून केंद्र सरकारने विकसित केलेले आरोग्यसेतू नावाचे नवे अॅप सुरू केले. हे ऍप प्रत्येक नागरिकाला करोना विषाणूचा संसर्ग होण्याचा कितपत धोका आहे याचे स्वतःलाच आकलन करून घ्यायला मदत करते.

अत्याधुनिक ‘ब्लू टूथ’ तंत्रज्ञान आणि ‘आर्टिफिशियल इंटिलीजन्स’चा (कृत्रिम बुद्धिमत्ता) वापर करून हे ऍप प्रत्येकव्यक्तीच्या समाजातील इतर व्यक्तींशी होणारे व्यवहारांचा आधार घेऊन करोनासंसर्गाच्या धोक्‍याची पातळी निश्‍चित करेल.

कुठल्याही व्यक्तीने त्याच्या स्मार्टफोन मध्ये एकदा हे अॅप घेतल्यानंतर अत्यंत सोप्या आणि वापरासाठी सुलभ क्रियांमधून ते परिसरातील आरोग्यसेतू असलेले इतर फोन ओळखून घेते. या फोनपैकी कुणाचा वापरकर्ता ‘कोविड-19′संसर्गाने बाधित असेल तर हे अॅप धोक्‍याची पातळी ठरविते.

या अॅपने गोळा केलेली वैयक्तिक माहिती गोपनीय ठेवण्यात येणार असूनभविष्यात केव्हाही आरोग्य विभागाला गरज लागली तर ती फोनमधून उपलब्ध होऊ शकेल. देशात हे ऍप 11 भाषांमध्ये उपलब्ध आहे. आतापर्यंत हे अॅप दहा कोटी नागरिकांनीआपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड केले आहे. अॅड्राईड आणि आयफोनच्या स्मार्टफोनवर हे अॅप डाउनलोड करतायेईल. या अॅपच्या माध्यमातूनआपल्या आसपासच्या कोरोना बाधित रुग्णांचे संक्रमणाचा अंदाज हे अॅप देऊ शकते.

लक्षात घ्या अॅप तेव्हाच काम करेल जेव्हा आपण आपल्या मोबाईल क्रमांकाने रजिस्टर कराल आणित्यानंतर ओटीपी ने व्हेरीफाईड करू.
यामध्ये एक फॉर्मदेखील दिसेल यात आपण गेल्या ३०दिवसांत विदेश दौरे केले असतील तर याबाबत इथे विचारले जाते. हा पर्याय युजरला स्किपदेखील करता येतो.
यामध्ये आपल्याला स्वयंसेवक म्हणून काम करायची इच्छा असल्यास याठिकाणी तो पर्यायदेखील उपलब्ध आहे. हे अॅप  हिरवा आणि पिवळ्या रंगाच्या कोडमध्ये युजरला सावध करते.
तसेच युजरने आता काय केले पाहिजे याबाबत मार्गदर्शनदेखील करते. हिरवा रंग सुरक्षित असल्याचा संदेश देतो तर पिवळा रंग धोका दाखवतो.

असे करा डाऊनलोड

११ भाषांमध्ये उपलब्ध
हे अॅप इंग्रजी आणि हिंदीसोबतच इतर ११ भारतीय भाषांमध्येउपलब्ध करून दिले आहे. अॅप उघडल्यानंतर युजर आपापल्या पद्धतीने यात भाषेचा बदल करू शकतो.
असे वापरा 
१. अॅप उघडल्यानंतर माहितीचे एक पान उघडेल ते मन लाऊन वाचा.
२. रजिस्टर नाऊ या बटनवर क्लिक करा.
३. मोबाईल क्रमांक ओटीपी व्हेरीफाय करा.
४. या अॅपला वापरण्यासाठी ब्‍लूटूथ आणि जीपीएसडेटा ची गरज लागेल., अॅपला काम करण्याची परवानगी द्या.
५. आपण कोरोना बाधित क्षेत्रात आहोत का? याबाबत हिरवा आणि पिवळ्या रंगाच्या कोडमधून निर्देशित केले जाते.
Deshdoot
www.deshdoot.com